IND VS AUS 3rd Test : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिजमध्ये कमाल प्रदर्शन करत आहे. गाबा टेस्टच्या दुसऱ्या दिवशी एका इनिंगमध्ये ६ विकेट्स घेऊन तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध 50 टेस्ट विकेट घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला. परंतु यानंतर सर्वत्र बुमराहच कौतुक होत असताना एक अनपेक्षित कमेंट बुमराहवर करण्यात आली. गाबा टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची माजी महिला क्रिकेटर आणि फॉक्स स्पोर्ट्सची कॉमेंटेटर ईसा गुहा हिने बुमराह विषयी बोलताना प्राइमेट शब्द वापरला ज्याचा अर्थ 'माकड' असा देखील होतो.  तिच्या या वक्तव्यावर चहू बाजुंनी टीका झाल्यावर महिला कमेंटेटरने सोमवारी बुमराहची माफी मागितली. 


काय म्हणाली ईसा गुहा? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसप्रीत बुमराहने तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 5 विकेट्स घेतल्या. यानंतर त्याची जगभरात प्रशंसा करण्यात आली. यावेळी इंग्लिश कॉमेंटेटर असणाऱ्या ईसा गुहा हिने बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक करताना त्याला असा शब्द वापरला ज्याचा अर्थ 'किमती माकड' असा होतो. ईसाचं हे वक्तव्य व्हायरल झालं आणि तिच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर सोमवारी सकाळी सामना सुरु झाल्यावर कॉमेंट्रीच्या सुरुवातीलाच तिने बुमराहची माफी मागितली.  


ईसा गुहाने म्हटले की, 'रविवारी समालोचन करताना मी एक शब्द वापरला ज्याचे अनेक अर्थ आहेत. सर्वप्रथम मी माफी मागते. जर मी काही चुकीचे बोलले  किंवा कोणाला दुखावले असेल तर'. ईसा पुढे म्हणाली, 'मी सर्वांचा आदर करते, जर तुम्ही कॉमेंट्रीचा संपूर्ण उतारा ऐकलात तर तुमच्या लक्षात येईल की मी भारताच्या महान खेळाडूचे कौतुक करत होते. मी समानतेवर विश्वास ठेवते. मी फक्त बुमराहच्या यशाबद्दल आणि यशाबद्दलच बोलत होते. मी कदाचित त्यासाठी चुकीचा शब्द वापरला असेल, ज्यासाठी मी माफी मागते. 


हेही वाचा : IND VS AUS : ऑस्ट्रेलियात चाललंय तरी काय? आधीच भारतासमोर 445 चं टार्गेट त्यात आता....



कोण आहे ईसा गुहा?


बुमराहवर आक्षेपार्य टिपण्णी करणारी ईसा गुहा ही स्वतः भारतीय वंशाची आहे. तिचे आई-वडील बंगाल येथील असून तिचे वडील बरुण गुहा आणि रोमा देब हे 1970 च्या दशकात ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले. ईसा गुहा ही इंग्लंडची माजी वेगवान गोलंदाज असून तिने 16 वर्षी इंग्लंड टीमकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला. 


भारताची प्लेईंग 11 :


यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.


ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :


उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.