Ishan Kishan Out From Duleep Trophy 2024  : विकेटकिपर फलंदाज ईशान किशनचे टीम इंडियात पुनरागमन होणं आता अवघड झालं आहे. मागील वर्षी टीम इंडियातून बाहेर पडल्यावर ईशानचं बीसीसीआय सोबतच कॉन्ट्रॅक्ट सुद्धा रद्द करण्यात आलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार परफॉर्मन्स करून ईशान पुन्हा टीम इंडियात येण्याची संधी शोधत होता मात्र दुखापतीमुळे त्याच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. बुची बाबू स्पर्धेत झारखंडकडून शतक ठोकल्यावर दुलीप ट्रॉफीमध्ये सुद्धा हाच फॉर्म कायम ठेवण्याचा मनसुबा ईशानचा होता, मात्र त्याच्या दुखापतीमुळे सर्व समीकरण बदलली आहेत. दुखापतीमुळे ईशान किशन दुलीप ट्रॉफीमधून बाहेर पडला असून त्याच्या जागी संजू सॅमसनची निवड झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशान किशनने अंडर 19 मध्ये खेळताना दाखवलेल्या जबरदस्त परफॉर्मन्समुळे त्याला टीम इंडियात संधी मिळाली होती. तसेच त्याला भारताकडून क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. 2023 मध्ये टीम इंडिया साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना ईशान किशनने मानसिक थकव्याचे कारण सांगून ब्रेक घेतला. त्याने स्वतः टेस्ट संघातून आपल्याला रिलीज केले जावे अशी विनंती केली होती आणि तो पुन्हा भारतात परतला. त्यानंतर तो टीम इंडियात संधी मिळावी यासाठी संघर्ष करत आहे. 


हेही वाचा : कॅप्टन शुभमनने घेतला अफलातून कॅच, हवेत उडी मारून ऋषभ पंतला स्वस्तात पाठवलं माघारी Video


 


टीम इंडियात पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेल्या ईशान किशनकडे दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तम परफॉर्मन्स करून टीम इंडियाच्या निवड समितीला इम्प्रेस करण्याची संधी होती. बुची बाबू स्पर्धेनंतर दुलीप ट्रॉफीमध्ये निवड समितीने ईशानला संधी दिली होती मात्र दुखापतीमुळे त्याला यातून बाहेर पडावे लागले आहे .  


टीम इंडियात स्थान मिळवणं अवघड : 


टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत आता पूर्णपणे तंदुरुस्त होऊन टीम इंडियात परतला आहे. याशिवाय ध्रुव जुरेलने सुद्धा विकेटकिपर म्हणून टीम इंडियात स्थान मिळवलं. त्यामुळे ईशान किशनच्या आधी निवडकर्ते भारतीय संघात ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंतला संधी देत आहेत. अनुभवी संजू सॅमसनने दुलीप ट्रॉफीमध्ये स्थान मिळवले आहे. जितेश शर्माही सातत्याने संघात आपला दावा मांडत असतो. तेव्हा अशा परिस्थितीत ईशान किशनला टीम इंडियात स्थान मिळवणं अवघड झालं आहे.