कॅप्टन शुभमनने घेतला अफलातून कॅच, हवेत उडी मारून ऋषभ पंतला स्वस्तात पाठवलं माघारी Video

पहिल्या सामन्यात टीम ए चा कॅप्टन शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शुभमन गिलने ऋषभ पंतची अफलातून कॅच पकडली ज्यामुळे पंतला स्वस्तात माघारी परतावे लागले. 

पुजा पवार | Updated: Sep 5, 2024, 02:55 PM IST
कॅप्टन शुभमनने घेतला अफलातून कॅच, हवेत उडी मारून ऋषभ पंतला स्वस्तात पाठवलं माघारी Video  title=
( Photo Credit : Social Media )

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी 2024-25 ला गुरुवार 5 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचे अनेक स्टार क्रिकेटर्स या स्पर्धेत खेळताना दिसत असून आज यात  टीम ए विरुद्ध टीम बी आणि टीम सी विरुद्ध टीम डी असे सामने खेळवले जात आहेत. पहिल्या सामन्यात टीम ए चा कॅप्टन शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शुभमन गिलने ऋषभ पंतची अफलातून कॅच पकडली ज्यामुळे पंतला स्वस्तात माघारी परतावे लागले. 

यंदा दुलीप ट्रॉफीचे 61 वे वर्ष असून टीम ए विरुद्ध टीम बी हा पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर तर टीम सी विरुद्ध टीम डी हा दुसरा सामना हा अनंतपुर येथील स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. टीम ए विरुद्ध टीम बी  या सामन्यात टीम ए चे नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. शुभमन गिलने सामन्याच्या सुरुवातीला टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम ए ची गोलंदाजी टीम बी वर भारी पडताना दिसली. यात यशस्वी जयस्वाल (30), मुशीर खान (50) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. वॉशिंग्टन सुंदर आणि नितेश रेड्डी यांना तर खातं सुद्धा उघडत आलं नाही. तर ऋषभ पंत (7) आणि सरफराज खान (9) यांना सुद्धा समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे परिणामी 94 धावांवर 7 विकेट्स असा टीम बी चा स्कोअर होता.

हेही वाचा : पॅरालिम्पिकमध्ये भारताची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, आतापर्यंत किती गोल्ड आणि सिल्व्हर मिळवले? पाहा यादी

 

शुभमनने घेतला अफलातून कॅच : 

दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंत 5 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. यावेळी त्याने 10 बॉलमध्ये 7 धावा केल्या यात एका चौकाराचा समावेश होता. मात्र ऋषभ पंतला मोठी कामगिरी करता आली नाही. आकाश दीपने टाकलेल्या 35 व्या ओव्हरचा दुसरा बॉल शुभमनने हवेत खेळला. यावेळी मैदानात फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या शुभमन गिलने धावत जात हवेत उडी मारून कॅच पकडला. शुभमचा हा अफलातून कॅच पाहून सर्वच थक्क झाले आणि ऋषभला अवघ्या 7 धावा करून मैदानाबाहेर जावे लागले. 

बांगलादेश विरुद्ध सीरिजसाठी होणार सिलेक्शन : 

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबर पासून टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना दुलीप ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यास सांगितले. अद्याप निवड समितीने बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीजसाठी भारतीय संघ जाहीर केलेला नाही. पुढील आठवड्यात भारतीय संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये जे खेळाडू उत्तम प्रदर्शन करतील त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष असेल अशा खेळाडूंना बांगलादेश सिरीजमध्ये संधी मिळू शकते.  

कधी, कुठे पाहाल सामने?

दुलीप ट्रॉफीचे यंदा 61वे वर्ष आहे.  दुलीप ट्रॉफी सामान्यांचे लाईव्ह टेलिकास्ट टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्क च्या चॅनेलवर होईल तर मोबाईल यूजर्स दुलीप ट्रॉफीचे सामने जीओ सिनेमावर फ्री मध्ये पाहू शकतात.