नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट्स फेडरल वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची सुरुवात जोरदार झाली. जितू राय आणि हिना सिद्धू यांनी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र संघ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. दिल्लीच्या करनी सिंग शूटिंग रेंजमध्ये ही मॅच सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वचषक स्पर्धेत 25 संघांचा सहभाग आहे. ज्यामध्ये आठ संघ मिक्स 10 मीटर एअर रायफल आणि 10 मीटर एअर पिस्टलमध्ये सहभागी आहेत.


९ गी संघ ISSF मिक्स डबल स्पर्धा आपल्या नावे करण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरतील. पिस्टल स्पर्धेत जितू राय आणि हिना सिद्धू यांनी मिक्स डबलचं भारताकडून प्रतिनिधित्व करत आहेत. तर दीपक कुमार आणि मेघना एअर रायफल स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करतील.