मुंबई : जगातली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून चार वेळेचा विश्वविजेता इटलीचा संघ पात्रता फेरीतच बाहेर पडलाय. स्वीडनशी झालेल्या मुकाबल्यात शेवटच्या मिनिटापर्यंत झालेल्या लढतीत सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शुट आऊटमध्ये स्वीडननं १-० अशी बाजी मारली. त्यामुळे २०१८ च्या विश्वचषक स्पर्धेत इटली संघ खेळू शकणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातला सर्वात चांगला संघ असलेल्या इटलीसाठी हा मोठा धक्का आहे. साठ वर्षात प्रथमच इटालियन संघावर विश्वचषकाच्या पात्रता फेरीतच बाहेर जाण्याची वेळ आलीय. संपूर्ण सामन्यात बराचवेळ बॉल इटलीच्या खेळाडूंकडे होता. पण तरीही ते गोल करू शकले नाहीत. त्यामुळे सामना स्वीडननं जिंकल्यापेक्षा इटलीनं हरला अशी प्रतिक्रिया संघाच्या चाहत्यांमध्ये व्यक्त होतेय.


क्वालिफाईंग सामन्यात स्वीडनने चांगला खेळ केला. इटलीची टीम त्यांची सुरक्षा भेदू शकले नाहीत. इतकेच नाही तर स्वीडनचा गोलकिपर रॉबिन ऑल्सेनला संपूर्ण सामन्यात केवळ एकदाच सरळ शॉटचा सामना करावा लागला. इटली टीम अजिबात आक्रामक दिसला नाही.


इटलीने शेवटचा २००६ मध्ये वर्ल्ड कप किताबावर कब्जा केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या दोन वर्ल्ड कपमध्ये इटली संघ ग्रुप स्टेजच्या बाहेरच होती. वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय न होऊ शकल्याने नाराज झालेला इटलीचा स्टार गोलकिपर जानलुईजी बुफॉन याने फुटबॉलमधून सन्यास घेतल्याची घोषणा केली.