मुंबई : पोर्ट एलिजाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला ७३ रन्सनी हरवलं. याचबरोबर ६ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं ४-१नं विजयी आघाडी घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत भारताचा हा पहिला वनडे सीरिज विजय आहे. भारताच्या दिग्गज कॅप्टनना जे जमलं नाही ते विराट कोहलीनं करून दाखवलं आहे. कॅप्टन विराट कोहली आणि भारतीय टीम हा इतिहास घडवल्यामुळे खुश आहेत. पण दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिसनं विराट कोहलीला सल्ला दिला आहे.


विराट कोहली आक्रमक पण...


विराट कोहलीची आक्रमकता त्याला स्वत:साठी फायदेशीर आहे पण कॅप्टन असताना त्यानं आक्रमकता कमी करावी, असं कॅलिस म्हणाला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सुरुवातीला २ टेस्ट हरल्यानंतरही विराट कोहलीवर टीका करण्यात आली होती.


विराट कोहली आक्रमक खेळाडू आहे याचा त्याच्या स्वत:च्या खेळावर फायदा होतो. पण टीमचं नेतृत्व करत असताना कोहलीला सुधारायची गरज आहे, असं कॅलिस म्हणालाय. कॅप्टन असताना तुम्ही नेहमीच आक्रमक असू शकत नाही. कोहली सध्या तरुण आहे आणि त्याला कर्णधाराच्या आक्रमकतेबाबत विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया कॅलिसनं दिली आहे.


भारतीय स्पिनर्सचं कौतुक


जॅक कॅलिसनं भारताचे स्पिनर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलचं कौतुक केलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये हे स्पिनर भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजवतील, असं कॅलिस म्हणालाय.