अडलेट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सीरीजमधील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत आधी फलंदाजीचा निर्णय घेतला. एरोन फिंच आणि एलेक्स कॅरी यांनी सुरुवातीला विकेट वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण ७ व्या आणि ८ व्या ओव्हरमध्ये त्यांना विकेट गमवावी लागली. यानंतर उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्शने इनिंग सांभाळली. रविंद्र जडेजाने उस्मान ख्वाजाला शानदारपणे रन आउट केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने सिडनी वनडे प्रमाणे धिम्या गतीने सुरुवात केली. पहिल्या ६ ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचे फक्त १८ रन झाले होते.  सातव्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने फिंचला बोल्ड केल आणि पुढच्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने एलेक्स कॅरीला माघारी पाठवलं. पहिल्या १० ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचे २ विकेट पडले. 


जडेजाची शानदार फिल्डींग


ख्वाजा आणि मार्शने चांगली भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाची इनिंग त्यांनी सांभाळली होती. पण रविंद्र जडेजाने ख्वाजाला शानदार फिल्डींग करत रनआउट केल. ऑस्ट्रेलियाला हा तिसरा झटका होता. ख्वाजा २१ रनवर आऊट झाला. कुलदीप यादवच्या ओव्हरमध्ये ही विकेट पडली. एक रन चोरण्याचा प्रयत्न करताना ख्वाजाला विकेट गमवावी लागली.



नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने 9 खेळाडूंच्या मोबदल्यात 298 धावा केल्या. यात शॉन मार्शच्या 131 धावांच समावेश आहे. तसेच 48 धावा करत मॅक्सवेलने त्याला उत्तम साथ दिली. भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 विकेट घेतले तर मोहम्मद शमीला 3 विकेट घेता आले. तसेच रविंद्र जडेजाला 1 विकेट मिळाली.