Big Boss OTT : सध्या बिग बॉस ओटीटी 2 ( Big Boss OTT ) सुरु झालं असून ते प्रचंड चर्चेत आहे. बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान याने 'बिग बॉस OTT 2' साठी OTT प्लॅटफॉर्मवर डेब्यू केलंय. या रिअॅलिटी शोचा भव्य प्रीमियर झाला. यावेळी सलमाानने सर्व स्पर्धकांची ओळख करून दिली. या शोमध्ये अनेक दिग्गजांनी सहभाग घेतलाय. दरम्यान यामध्ये भारतीय माजी खेळाडू जडेजा ( Ajay Jadeja ) बिग बॉस OTT 2 मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता फार वाढली आहे.


अजय जडेजाही होणार Big Boss मध्ये एन्ट्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओटीटी प्लॅटफॉर्म असो किंवा छोटा पडदा बिग बॉसचे चाहते काही कमी नाही. या शोमध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती मिळते. दरम्यान या शोमध्ये अनेकदा कधी कधी मोठ्या सिक्रेटाही खुलासा होते. दरम्यान टीम इंडियाचा ( Team India ) माजी खेळाडू अजय जडेजा हा लोकप्रिय शो बिग बॉस ओटीटी ( Big Boss OTT ) मध्ये एन्ट्री करणार आहे.


या लोकप्रिय शोमध्ये एन्ट्री घेण्याबाबत अजय जडेजा म्हणाला की, "बिग बॉस ओटीटीमध्ये ( Big Boss OTT ) , संपूर्ण देशाला तुमची खरी ओळख होण्यास मदत होते. यामध्ये तुमच्या प्रत्येक विचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, ज्यासाठी मी खूप उत्सुक आहे. भारतातील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोचा एक भाग होण्यासाठी आणि संपूर्ण नवीन पिढीशी संवाद साधण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे. माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव असणार आहे."


कसं होतं अजय जडेजाचं क्रिकेट करियर


टीम इंडियाचा माजी खेळाडू अजय जडेजाच्या क्रिकेट कारकिर्द पाहिली तर त्याने आतापर्यंत एकूण 15 टेस्ट सामने खेळले आहेत. या टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 26 च्या सरासरीने फलंदाजी करताना 24 डावात 576 रन्स केले आहेत. याशिवाय टेस्ट क्रिकेटमध्ये 4 वेळा अर्धशतकंही ठोकलीये.


तर जडेजाने एकून 196 वनडे सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 37 च्या सरासरीने फलंदाजी करताना 179 डावांमध्ये 5359 रन्स केलेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजय जडेजाने 6 शतकं आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय जडेजाने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे.