आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जयस्वालची `यशस्वी` भरारी, कॅप्टन रोहितलाही टाकलं मागे; `या` स्थानावर पोहोचला
ICC Test Ranking : भारतविरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच टेस्ट सामन्याची सिरीज खेळली जात आहे. नुकताच आयसीसीने नवी टेस्ट रॅंकिंग घोषित केली. यशस्वी जयस्वालच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याने बॅटिंगच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये 12 व्या स्थानी झेप घेऊन घेतली आहे. एवढंच नाही तर त्याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला मागे टाकले आहे.
Yashasvi Jaiswal ICC Test Ranking : भारतीय टेस्ट ओपनर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) हा इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये आग ओकत आहे. त्याने या सिरीजमध्ये आतापर्यंत 93.57 च्या सरासरीने एकूण 655 धावा बनवल्या आहेत. जरी यशस्वी हा चौथ्या टेस्ट मॅचमध्ये फक्त 73 आणि 37 धावा बनवू शकला तरी त्याने आतापर्यंत दोन दुहेरी शतक आणि दोन अर्धशतक ठोकलेले आहे. या प्रदर्शनामुळे यशस्वीने आयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. भारतीय कप्तान रोहित शर्माला मागे टाकत यशस्वी हा 12 व्या स्थानी पोहोचला आहे. त्याच्या या गगनभरारीमुळे आता तो विराट कोहली पासून फक्त 2 स्थान दूर आहे.
एकही भारतीय फलंदाज टॉप 5 मध्ये नाही
आयसीसीच्या नवीन टेस्ट रॅंकिंगमध्ये एकही भारतीय फलंदाज नाही. या रॅंकिंगमध्ये केन विलियम्सन हा अव्वल स्थानावर असून त्याची रेटिंग 893 आहे. दुसऱ्या स्थानी स्टिव्ह स्मिथ असून त्याची 818 रेटिंग आहे. जो रूट याने 799 रेटिंग मिळवून तिसरे स्थान काबिज केलंय. चौथ्या आणि पाचव्या स्थानी डॅरेल मिचेल आणि बाबर आजम हे दोघं प्रत्येकी 780 आणि 768 रेटिंग घेवून टॉप 5 मध्ये आपले स्थान टिकवून आहे. नवल करण्याची गोष्ट म्हणजे टॉप 5 मध्ये फॅब 4 चा हिस्सा असलेला विराट कोहली चक्क 9 व्या स्थानी आहे. विराटने वैयक्तिक कारणास्तव सध्या चालू असलेल्या इंडियाविरूद्ध इंग्लंड सिरीजमधून माघार घेतली आहे. आणखी आर्श्चयाची गोष्ट म्हणजे आयसीसीच्या नवीन टेस्ट रॅंकिंगच्या यादीमध्ये रोहित शर्माचे नाव हे 13 व्या स्थानी आहे. रोहितने इंग्लंडविरूद्धच्या टेस्ट कसोटीमध्ये एक शतकसुद्धा मारले आहे, तरी त्याचे मानांकन एक स्थानाने घसरले आहे.
टेस्ट रॅंकिंगच्या यादित होऊ शकतो बदल
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातसुद्धा कसोटी मालिका चालू आहे. या मालिकेतील काही स्टार बैस्टमनसुद्धा बॅटिंग टेस्ट रॅंकिंगच्या यादीत आहेत. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅविस हेड हा सध्या 10 व्या स्थानावर आहे तर इंग्लंडचा हॅरी ब्रुक हा 11 व्या स्थानी आहे. या दोघं फलंदाजांना विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी आहे. या सिरीजमध्ये टॉप 2 फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि जो रूट हे पण आपल्याला या सिरीजमध्ये खेळताना दिसतील.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या टेस्ट मालिकेत टीम इंडियाकडे 3-1 ची विजयी आघाडी आहे. त्यामुळे आता शेवटच्या कसोटी सामन्यात (IND Vs ENG 5th Test) टीम इंडिया बदल करणार का? असा सवाल विचारला जात आहे. केएल राहुल जायबंदी झालाय, तर बुमराह पुनरागमन करण्याची शक्यता आहे.