मेलबर्न : जपानची नाओमी ओसाकाने आज शनिवारी (२६ जानेवारी)  ऑस्ट्रेलिया ओपनच्या महिला सिंगल्स चा किताब आपल्या नावे केला. नाओमीने गणराज्य च्या पेट्रा क्वितोवाचा ७-६, ५-७, ६-४ ने पराभव केला. नाओमी ओसका आणि  पेट्रा क्वितोवा मध्ये तब्बल दोन तास २७ मिनिटं हा अंतिम सामना रंगला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



या विजयासोबत नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी पहिल जपानी खेळाडू ठरली आहे. या विजयसोबतच येत्या सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या डबल्यूटीएच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहचली. ती टेनिस सिंगलच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी  पोहचणारी पहिली आशियाई खेळाडू ठरेल. या विजयाआधी तिने  यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती. सलगपणे ऑस्ट्रेलियन ओपन आणि युएस ओपन स्पर्धा जिंकत ओसाकाने सेरेना विलियमस्च्या विक्रमाची बरोबरी केली.



नाओमी ओसाकाने गुरुवारी दिग्गज सेरेना विल्यिमसचा पराभाव करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात धडक मारली. २१ वर्षीय ओसाका ही चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या सपर्धेत सहभागी झाली होती. तिला विजयासाठी तब्बल चौथ्या स्पर्धेपर्यंत वाट पाहावी लागली.