कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मार्टिन गुप्टिलची विकेट घेत एकदिवसीय सामन्यात 50 बळी पूर्ण केले आहेत. बुमराहने 28 व्या एकदिवसीय लढतीत हा पराक्रम केला आहे. अशा प्रकारे कमीत कमी सामन्यांमध्ये 50 बळी मिळविणारा बुमराह दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा विक्रम अजित आगरकरच्या नावावर आहे. जो त्याने 23 सामन्यांत केला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलद ५० विकेट घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या अजंता मेंडिसच्या नावावर आहे. त्याने 19 सामन्यांमध्ये 50 बळी घेतले होतेय.


भारताकडून आगरकर आणि बुमराहनंतर मोहम्मद शमी (29 सामने), इरफान पठाण (31 सामने) आणि अमित मिश्रा (32 सामने) यांचा नंबर लागतो.