सेंच्युरिअन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं शतकी खेळी केली. विराटच्या या शतकामुळे भारताचा स्कोअर ३००च्या पार गेला. यानंतर बॅटिंगला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला जसप्रीत बुमराहनं सुरुवातीलाच दोन धक्के दिले. बुमराहनं मारक्रम आणि हाशीम आमलाला तीन ओव्हरमध्येच पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या दोघांची विकेट गेली तेव्हा स्कोअर फक्त तीन रन्स एवढाच होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन विकेट गेल्यानंतर डीन एल्गार आणि एबी डिव्हिलियर्सनं दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याला सुरुवात केली. पण जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर भारताला पुन्हा एकदा विकेट घ्यायची संधी मिळाली पण विकेट कीपर पार्थिव पटेल या संधीचं सोनं करु शकला नाही. डीन एल्गार २९ रन्सवर असताना पार्थिव पटेलच्या बाजूनं कॅच गेला पण त्यानं तो पकडला नाही.


पार्थिव पटेलनं सोडलेल्या या कॅचवर जसप्रीत बुमरहानं प्रतिक्रिया दिली आहे. पार्थिव पटेलनं सोडलेल्या कॅचबाबत मला कोणताही राग नाही. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होतच असतात. पार्थिव पटेलवर दबाव टाकण्यात काहीच अर्थ नाही. अजून बराच खेळ बाकी आहे, असं वक्तव्य बुमराहनं केलं आहे.


सुरुवातीला बॉल स्विंग होत असल्यामुळे विकेट मिळाल्या. पण पावसानंतर खेळ सुरु झाल्यावर मैदान ओलं होतं त्यामुळे बॉलही ओला झाला. बॉल ओला असल्यामुळे स्विंग झाला नाही, असं बुमराह म्हणलाय.