Birthday Special: बुमरानं रोमँटिक फोटो शेअर करत पत्नी संजनाला दिल्या शुभेच्छा
भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्स संघातील स्टार बॉलर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा आज वाढदिवस आहे.
मुंबई: भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्स संघातील स्टार बॉलर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा आज वाढदिवस आहे. बॉलर जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला आहे. सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत बुमराहने पत्नी संजना गणेशनला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
इन्टावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये आपण पाहू शकता संजनाने बुमराहच्या गालावर किस केलं आहे. या स्पेशल क्षणाचा फोटो बुमराहने शेअर करत वाढदिवसाच्या खास शुभेच्छा आपल्या बायकोला संजनाला दिल्या आहेत. त्यांच्या या रोमँटिक फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
'तू माझी आहेस I love you...' कॅप्शन देत बुमराहने हा फोटो शेअर केला आहे. संजना गणेशन आणि बुमराहने 15 मार्च रोजी गोव्यात खासगी लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. आपल्या लग्नासाठी त्याने चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. त्यानंतर IPL पर्यंत बुमराहला आराम देण्यात आला होता.
जसप्रीत बुमराह IPLमध्ये दिसला. त्याने मुंबई इंडियन्स संघाकडून जबरदस्त कामगिरी केली आहे. बुमराहने 2016मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने कधीच आपल्या कर्णधाराला गोलंदाजीच्या बाबतीत नाराज न केल्याचेही किस्से सांगितले जातात.