javed miandad on bcci vs pcb asia cup 2023 host: आशिया चषक (asia cup 2023) कुठे खेळवला जाणार? यावरुन बीसीसीआय (bcci) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डादरम्यानचे (pcb) मतभेद उघडपणे समोर आले आहेत. पाकिस्तानला यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचं यजमानपद मिळालं आहे. मात्र भारताने पाकिस्तानच्या यजमानपदाअंतर्गत खेळण्यास नकार दिला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी न्यूट्र्ल वेन्यूवर मालिका खेळवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणासंदर्भात आशियाई क्रिकेट काउन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रश्न सुटण्याऐवजी अधिक वाढला. यादरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादने (javed miandad) वादग्रस्त विधान केलं आहे.


काय म्हणाले मियादांद?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये येऊन आशिया चषक न खेळण्याच्या भूमकेसंदर्भात जावेद मियांदादला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मियांदाद यांनी, "मी तर आधीच यासंदर्भात सांगितलं आहे की जर भारताला इथं (पाकिस्तानमध्ये) खेळायचं नसेल तर खड्ड्यात गेला भारत, आम्हाला काही फरक पडत नाही. मी नेहमीच पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे," असं म्हटलं. तसेच, "तुम्हाला ठाऊक आहे प्रश्न जेव्हा भारत-पाकिस्तानचा असतो तेव्हा मी कधीच भारताला स्वस्तात सोडलेलं नाही. मात्र आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. यासाठी अगदी अगदी शेवटपर्यंत या संघर्षात टिकून राहिलं पाहिजे," असंही जावेद मियांदाद म्हणाले.


नियम सारखेच हवेत


पाकिस्तानी क्रीडा पत्रकार फरीद खान यांनी जेवेद मियांदाद यांनी केलेल्या विधानाच्याआधारे, "भारत आमच्याकडे खेळायला आला तर ठीक आहे नाहीतर आम्हाला फरक पडत नाही. आम्ही तर यजमानपदाची जबाबदारी पार पाडणार आहोत. हे आयसीसीचं काम आहे त्यांनी यासंदर्भात काय ते पहावं. आयसीसीला यावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर या संस्थेला काहीही अर्थ नाही. आयसीसीने प्रत्येक क्रिकेट बोर्ड आणि संघासाठी नियम सारखेच ठेवले पाहिजे," असंही मियांदाद म्हणाले.


...तर भारतात येणार नाही


"अशाप्रकारे कोणीही कोणत्याही देशात खेळण्यास नकार दिला तर त्या संघाला स्पर्धेतून बाहेर केलं पाहिजे," असंही मियांदाद यांनी आपला संताप व्यक्त करताना म्हटलं. यापूर्वी, आशिया क्रिकेट काऊन्सिलच्या बैठकीनंतर पीसीबीच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, चेअरमन नजम सेठी यांनी या बैठकीमध्ये थेट इशारा दिला. भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये आला नाही तर पाकिस्तानी संघही एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात येणार नाही, असं सेठी यांनी सांगितलं. 



2 सप्टेंबरपासून आशिया चषक स्पर्धा सुरु होणार आहे. सध्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना 9 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.