महाराष्ट्राचं पोरगं World cup जिंकवून देणार, धोनीला पर्याय मिळाला... `हा` खेळाडू घेणार Rishabh Pant ची जागा?
Jitesh Sharma,Team india: आयपीएलमध्ये सर्वांच्या नजरेत खिळतोय तो पंजाब किंग्जचा (PBKS) जितेश शर्मा (Jitesh Sharma). अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू वसीम जाफर (Wasim Jaffer) याने मोठं वक्तव्य केलंय.
Wasim Jaffer On Jitesh Sharma: आयसीसीचा वनडे क्रिकेट वर्ल्डकप 2023 चं यजमानपद भारत भूषवणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्डकपचं आयोजन येत आहे, त्यामुळे आता भारत मागील वर्षीप्रमाणे वनडे वर्ल्ड कप (ODI World cup 2023) घरच्या मैदानावर जिंकणार का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. आयपीएलच्या 16 व्या हंगामानंतर बीसीसीआय (BCCI) लवकरच वर्ल्डकपचं शेड्यूल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलंय. अशातच आता महाराष्ट्राचं पोरगं भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणार अशी चर्चा मात्र सुरू झालीये.
टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण
केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह हे दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर आहेत. त्यामुळे आता टीम इंडियामध्ये नव्या खेळाडूंची भरती होत आहे. यात तरुणांना वाव मिळत असल्याचं दिसतंय. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अनेक तरुण खेळाडूंनी आपलं कामगिरीचं प्रदर्शन केलं. यात सर्वांच्या नजरेत खिळतोय तो पंजाब किंग्जचा जितेश शर्मा (Jitesh Sharma). अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू वसीम जाफर (Wasim Jaffer) याने मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाला Wasim Jaffer ?
गेल्या वर्षीही जितेशने चांगली कामगिरी केली होती. मला वाटतं की तो आणखी चांगलं खेळ दाखवतो, त्याच्या फलंदाजीमध्ये सुधारणा देखील झालीये, तो आधिक चांगला विकेटकीपर आहे. तो विदर्भासाठी खेळायचा तेव्हापासून मी त्याला ओळखतो, मी त्याच्यासोबत खेळलो आहे, असं म्हणत वसीम जाफर यांनी जितेश शर्माचं (Jitesh Sharma) तोंडभरून कौतूक केलंय.
जितेश एक फलंदाज आणि फिनिशर म्हणून इतका चांगला विकसित होताना पाहून मला आनंद होतो, जितेश 5, 6 अगदी 7 क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि दर्जेदार गोलंदाज देखील आहे, संघ बिकट परिस्थितीत असताना ऑलराऊंडर भूमिका देखील जितेश बजावू शकतो. मला वाटतं की तो भारतीय संघात खेळण्यासाठी जवळजवळ तयार आहे, असं वसीम जाफर (Wasim Jaffer On Jitesh Sharma) यांनी म्हटलं आहे.
कुठे असणार World cup चे सामने?
दरम्यान, नागपूर, बंगळुरु, त्रिवेंद्रम, मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, कोलकाता, राजकोट, लखनऊ, गुवाहाटी, इंदौर आणि धर्मशाला या शहरात वनडे वर्ल्ड कपचे सामने खेळवले जाणार आहेत.
आणखी वाचा - क्रिकेट जगतातून मोठी बातमी! एशिया कप स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जाणार नाही?
MS Dhoni ला पर्याय मिळाला?
जिथं गरज असेल तिथं जितेश शर्मा फलंदाजीला येऊ शकतो. एक उत्तम फिनिशर म्हणून त्याला पाहिलं जातं. जितेश शर्माने (Jitesh Sharma) मुंबई विरुद्ध 27 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे धोनीला पर्याय मिळाल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे त्याच्या कामगिरीमुळे बीसीसीआय त्याला टीम इंडियामध्ये (Team India) संधी देणार का? असा सवाल उपस्थित केला जातो.