वृद्धिमान साहाच्या खळबळजनक खुलाशानंतर बीसीसीआयमध्ये वादळ, बोर्ड ऍक्शनमोडमध्ये
यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने केलेल्या या आरोपांनंतर बीसीसीआयने आता कारवाईचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : टीम इंडियाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज वृद्धिमान साहाने एकामागून एक खुलासे करून खळबळ उडवून दिली आहे. वृद्धिमान साहाने अलीकडेच एका पत्रकारावर मुलाखतीसाठी धमकी दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीसीसीयाने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
वृद्धिमान साहाने सोशल मीडियावर मुलाखतीसाठी धमकी देणाऱ्या पत्रकाराच्या व्हॉट्सअॅप संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. त्यानंतर मोठा गदारोळ माजला होता.
बीसीसीआय अॅक्शनमोडमध्ये
वृद्धिमान साहाच्या आरोपांनंतर आता बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये आली आहे. बीसीसीआयने याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. साहा बीसीसीआयशी करारबद्ध खेळाडू आहे, अशा परिस्थितीत बोर्ड आपल्या खेळाडूंना एकटे सोडू शकत नाही.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. साहाने केलेल्या आरोपांची चौकशी बोर्ड चौकशी करणार आहे. याआधी कोणत्या क्रिकेटपटूला अशा धमक्यांचा सामना करावा लागला आहे का, याचाही बोर्ड शोध घेणार आहे. मात्र, त्याआधी बीसीसीआयने साहाला त्या व्यक्तीचं नाव बोर्ड अधिकाऱ्यांकडे उघड करण्यास सांगितलं आहे.
मुलाखतीसाठी पत्रकाराने दिली होती धमकी?
वृद्धिमान साहाने ट्विटरवरचा एक स्क्रीनशॉट शेअर केला होता, ज्यामध्ये पत्रकाराने त्याला सांगितले होतं की, त्याला साहाची एक मुलाखत घ्यायची आहे आणि हे तुझ्यासाठी चांगले असेल. निवडकर्त्यांनी केवळ एका यष्टीरक्षकाची निवड केली आहे. आणि तू ११ पत्रकार निवडण्याचा प्रयत्न केला. ही बाब माझ्या मते योग्य नाही. त्यांची निवड करा जे तुमची अधिकाधिक मदत करू शकतील. पण तू कॉल केला नाहीस. मी आता तुझा कधीही इंटरव्यू घेणार नाही आणि ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवीन.
वृ्ध्दिमान साहाचा गांगुली आण द्रविडवरही आरोप
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावरही साहाने गंभीर आरोप केले होते. 'संघ व्यवस्थापनाने मला सांगितलं की माझी आता निवड होणार नाही. मी आत्तापर्यंत भारतीय संघाचा भाग असल्यानं मला त्याबद्दल सांगता आलं नाही. इतकंच नाही तर प्रशिक्षक राहुल द्रविडनेही मी निवृत्तीचा विचार करायला हवा, असं म्हटलं होतं.