मुंबई  : क्रिकेट विश्वात अनेक विक्रम होताना आपण पाहिले आहे. आता तर एका ओव्हरमध्ये अनोखा विक्रम झालाय. या खेळाडूने चक्क ३७ धावा कुटल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज जे. पी. ड्युमिनी आहे. एका षटकात त्यांने ३७ धावा ठोकण्याचा पराक्रम केलाय. मॉमेंटम वनडे कप क्रिकेट स्पर्धेत केप कोब्रा संघाकडून खेळताना नाइट्स संघाविरुद्ध ड्युमिनीने हा विक्रम केलाय.


असा झाला विक्रम


फिरकीपटू एडी लीच्या पहिल्याच चेंडूवर ड्युमिनीने षटकार ठोकला. त्यानंतर लागोपाठ आणखी तीन उत्तुंग षटकार ठोकले. मात्र, पाचव्या चेंडूवर ड्युमिनीने २ धावा घेतल्या आणि ५ चेंडूत २६ धावा त्याच्या नावार झाल्यात. लीचा नंतरचा चेंडू नो बॉल पडला. त्यावर ड्युमिनीने चौकार ठोकला. त्यामुळे त्याला ५ धावा मिळाल्या. तर सहाव्या चेंडूवर ड्युमिनीने आणखी एक षटकार ठोकला आणि एका षटकात ३७ धावा बनवण्याचा विक्रम रचला. ड्युमिनीने ३७ चेंडूत ७० धावांची खेळी करत आपल्या संघाला विजयही मिळवून दिला. या खेळीत त्यांन २ चौकार आणि ७ षटकार ठोकले.


संघाला विजय मिळवून दिला


प्रथम फलंदाजी करणाऱ्या नाइट्स संघाने केप कोब्राला विजयासाठी २४० धावांचे उद्दीष्ट दिले होते. या धावांचा पाठलाग करताना केप कोब्राने ३५ षटकांत २ बाद २०८ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. तरीही बोनस गुणांसाठी त्यांना झटपट लक्ष्य पूर्ण करायचे होते. त्यामुळेच कर्णधार ड्युमिनीने ३६ व्या षटकात गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. त्यांने ३७ चेंडूत ७० धावांची खेळी करत आपल्या संघाला विजयही मिळवून दिला.