SRH vs MI: सोमवारी वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईच्या टीमने सनरायझर्स हैदराबादला 7 विकेट्सने पराभूत केलं. या सामन्यामध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र सामना सुरु असताना कॅमेराची नजर पडली ती स्टॅंडमध्ये बसलेल्या संजना गणेशनवर आणि तिच्या कुशीत बसलेल्या छोट्या बाळावर. संजना पहिल्यांदाच बाळाला घेऊन सामना पाहण्यासाठी आली होती. यावेळी कॅमेराने जसप्रीत आणि संजानाच्या मुलाची पहिली झलक टिपली. 


पहिल्यांदाच कॅमेरात दिसला अंगद बुमराह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅमेऱ्याची नजर संजना गणेशनवर पडताच तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. केवळ संजनाच नाही तर तिचा मुलगा अंगद बुमराहही मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचला होता. संजनाच्या मांडीवर असलेल्या अंगदचे फोटो सोशल मीडियावर लोकांना फारच आवडले आहेत. आपल्या वडिलांना सपोर्ट करण्यासाठी अंगद पहिल्यांदाच स्टेडियममध्ये हजर होता. 



संजनाचा होता वाढदिवस


जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हिचा सोमवारी वाढदिवस देखील आहे. संजनाचा जन्म 6 मे 1991 रोजी पुण्यात झाला. जसप्रीतनेही सोशल मीडियावर पोस्ट करत पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करताना जसप्रीत म्हणाला की, त्याच्या आणि अंगदच्या बाजूने संजनावर खूप प्रेम आहे. तसंच संजना असण्याने त्याचे आयुष्य अधिक समृद्ध झालंय असंही बुमराह म्हणाला होता.


गेल्या वर्षी झालेला अंगदचा जन्म


जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन 15 मार्च 2021 रोजी लग्नबंधनात अडकले होते. अडीच वर्षांनंतर अंगदचा जन्म झाला. अंगद बुमराहचा जन्म 4 सप्टेंबर 2023 रोजी झाला. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी त्यांच्या मुलाच्या जन्माबद्दल सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आणि सांगितलं की, नवीन सदस्याच्या आगमनाने त्यांच्या आयुष्यात एक नवीन गोष्टीला सुरुवात होणार आहे. अशातच पहिल्यांदाच चाहत्यांना अंगदची झलक पहायला मिळाली.