IPL 2024: वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या `या` बड्या खेळाडूची LSG च्या हेड कोचपदी नियुक्ती!
Lucknow Super Giants, Justin Langer: जस्टिन लँगरने (Justin Langer) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने एंडी फ्लावर (Andy Flower) यांचे आभार मानले आहेत.
Justin Langer Appointed as Head Coach Of LSG: ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांची लखनऊ सुपर जायंट्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जस्टिन लँगरने (Justin Langer) मुख्य प्रशिक्षक म्हणून टी-ट्वेंटी विश्वचषक आणि तीन बिग बॅश लीग जिंकले आहेत. तर एंडी फ्लावर यांना 'टाटा गुड बाय' करण्यात आलं आहे. लखनऊ सुपर जायंट्सने एंडी फ्लावर (Andy Flower) यांचे आभार मानले आहेत. जस्टिन लँगर यांच्या नियुक्तीमुळे आता लखनऊ सुपर जायन्ट्स (LSG) ताकद पुढील वर्ल्ड कपमध्ये वाढणार असल्याचं स्पष्ट झालंय.
लखनऊ सुपर जायंट्सने महान माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आणि फलंदाज जस्टिन लँगर यांना लखनऊ सुपर जायन्टचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आल्याची माहिती संघाकडून देण्यात आली आहे. अँडी फ्लॉवरचा दोन वर्षांचा करार संपत असताना, लखनऊ सुपर जायंट्स अँडी फ्लॉवरचे त्याच्या योगदानाबद्दल आभार मानते आणि त्यांची वाट मोकळी केली आहे.
पाहा ट्विट -
जस्टिन लँगर यांची 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेत इंग्लंडला 4-0 ने पराभूत करून विजेतेपदावर कब्जा केला. एवढंच नाही तर 2011 मध्ये लँगरच्या कार्यकाळात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला होता. याशिवाय पर्थ स्कॉचर्सने लँगरच्या मार्गदर्शनाखाली तीन वेळा बिग बॅशचे जेतेपद पटकावलं आहे.
लखनऊ सुपर जायंट्स ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक जस्टीन लँघर यांना संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करत आहे. अँडी फ्लॉवर यांचा दोन वर्षांच्या कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी संघासाठी दिलेल्या योगदानासाठी आभार मानले आहे, असं लखनऊ सुपर जायन्ट्सने म्हटलं आहे.
जस्टिन लँगर म्हणतात...
मुख्य प्रशिक्षक म्हणून एलएसजीमध्ये सामील झाल्यावर जस्टिन लँगर म्हणाले, “लखनऊ सुपर जायंट्स आयपीएलमध्ये एक यशस्वी प्रवासाच्या मार्गावर आहे. त्या प्रवासात दमदार कामगिरीची आम्हा सर्वांची भूमिका आहे आणि मी पुढे जाणाऱ्या संघाचा एक भाग बनण्यास उत्सुक आहे.”