जकार्ता : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन  स्पर्धेचे जेतेपद पटकावलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम फेरीत श्रीकांतने जपानच्या के साकाईला २१-११, २१-१९ असे सरळ दोन गेममध्ये पराभूत करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले. 


दोन्ही गेममध्ये श्रीकांतचेच पारडे जड होते. पहिला गेम सहजरित्या हरल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये साकाईने लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटच्या क्षणी श्रीकांतने जबरदस्त खेळ करताना जेतेपद मिळवले. याआधी त्याने सेमीफायनलमध्ये सो वॅन होला नमवले होते.