मुंबई : आयपीएलमध्ये कोरोना शिरला आहे. दिल्ली टीममधील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे संध्याकाळच्या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दिल्लीमधील सपोर्ट स्टाफपैकी 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे पुण्याला होणारा सामना रद्द करण्यात आला असून ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना होणार आहे. या सामन्याआधी कगिसो रबाडाने मोठं विधान केलं आहे. 


पंजाबने आधीचा हैदराबाद विरुद्धचा सामना गमवला आहे. त्यामुळए आता दिल्लीविरुद्ध सामन्यासाठी कसून तयारी करावी लागणार आहे. पंजाबला हा सामना जिंकणं प्ले ऑफच्या दृष्टीनं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. 


लिविंगस्टोन आणि धवन शिवाय कोणीच मोठी खेळी करू शकलं नाही. त्यामुळे यावेळी फलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. पावर प्ले आणि डेथ ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करणं पंजाबसाठी गरजेचं असणार आहे. गेल्या सामन्यातील चूक सुधारण्याची संधी असल्याचं रबाडाने म्हटलं आहे. 


पंजाब संभाव्य प्लेइंग इलेव्हन : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, जॉनी बेयरस्टो, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कगिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंह


दिल्ली संभाव्य प्लेइंग इलेव्हन टीम : पृथ्वी शॉ, डेविड वार्नर, टिम सीफर्ट, ऋषभ पंत (कर्णधार), रोवमैन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजूर रहमान, खलील अहमद