`विवियन रिचर्डसारखाच विराटही क्रूर`
विराट कोहली सध्या रेकॉर्डचा पाऊस पाडतोय... आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं कौतुक न व्हावं तरच नवलं...
मुंबई : विराट कोहली सध्या रेकॉर्डचा पाऊस पाडतोय... आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं कौतुक न व्हावं तरच नवलं...
लोकप्रियतेच्या बाबतीत विराट क्रिकेट जगतात टॉपवर आहे. जगातील अनेक दिग्गज विराटच्या खेळाच्या आणि त्याच्या कॅप्टन्सीच्या प्रेमात पडतायत. दिवसेंदिवस त्याच्या चाहत्यांची लिस्ट लांबतच चाललीय. यामध्ये आता आणखी एक नाव जोडलं गेलंय... आणि ते म्हणजे वेस्ट इंडिजचा महान खेळाडू आणि माजी कॅप्टन एल्विन कालीचरण...
एका मुलाखतीत कालीनं विराटचं तोंडभरून कौतुक केलंय. टीम इंडिया आणि कॅप्टन विराट कोहलीवर त्याला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा कालीनं विराटची तुलना विवियन रिचर्डच्या क्रूरतेशी केली.
बॅटसमन म्हणून विराट कोहली क्लासिक आहे. मला दोन खेळाडूंची तुलना पसंत नाही पण मी हे जरूर म्हणू शकतो की विव रिचर्ड आणि विराट दोघांचाही एटीट्युड स्ट्राँग आहे... दोघंही आपल्या बॅटमधून एकसमान क्रूर आहेत, असं कालीनं म्हटलंय.
एल्विन कालीचरणशिवाय जावेद मियाँदाद आणि वसीम अकरमसारख्या खेळाडुंनीही कोहलीवर स्तुतीसुमनं उधळलीत.