Kane Williamson: केन विलियम्सनने केलं गलिच्छ कृत्य? कॅमेरात कैद झाली घटना, व्हिडीओ व्हायरल
Kane Williamson: सध्या न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टेस्ट सामना सुरु आहे. या टेस्ट सामन्यादरम्यान प्रॅक्टिस सेशनमध्ये केन विलियम्सनने केलेल्या कृत्याची फार चर्चा होतेय.
Kane Williamson: क्रिकेट हा जेंटलमन गेम मानला जातो. क्रिकेटमध्ये सर्वात शांत आणि संयमी खेळाडू म्हणून न्यूझीलंडच्या केन विलियम्सनकडे पाहिलं जातं. जेंटलमन गेम म्हणून केन विलियम्सन एक उत्तम उदाहरण आहे. क्रिकेटच्या मैदानावर फार क्वचितच केन संतापलेला किंवा चिडलेला दिसला असेल. मात्र आता केनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो व्हिडीओ पाहून केनचे चाहते मात्र चांगलेच हैराण होणार आहेत.
सध्या न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टेस्ट सामना सुरु आहे. या टेस्ट सामन्यादरम्यान प्रॅक्टिस सेशनमध्ये केन विलियम्सनने केलेल्या कृत्याची फार चर्चा होतेय. प्रॅक्टिस सेशनमध्ये केन विलियम्सनने केलेलं एक कृत्य कॅमेरात कैद झालं आहे. कदाचित केनच्या चाहत्यांनी केनकडून या कृत्याची अपेक्षा केली नसावी. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.
नेमकं काय केलं केन विलियम्सनने?
आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, केन विलियम्सनने असं काय केलं असेल. ही घटना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी घडलेली पहायला मिळाली. न्यूझीलंडची टीम वॉर्म अप करत असताना एक क्रिकेट बॉल केनच्या पायावर येऊन लागला. यावेळी केनने ज्याने बॉल मारला त्याला मिडल फिंगर दाखवला आहे. यावेळी केन असं करू शकेल याची अपेक्षा कदातिच केनच्या चाहत्यांनी केली नसेल.
केन विलियम्सनची तुफान खेळी
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात केन विलियम्सनने तुफान फलंदाजी केली. या सामन्यात दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावली आहे. माऊंट मौनगानुई बे ओव्हलमधील पहिल्या टेस्टमध्ये लागोपाठ शतकं झळकावत त्याने एक खास रेकॉर्ड देखील आपल्या नावे केला आहे. या सामन्यात पहिल्या डावात 289 बॉल्समध्ये 16 चौकारांसह 118 रन करणाऱ्या केनने दुसऱ्या डावातही शतक ठोकलं आहे. केनने 132 बॉल्समध्ये 1 षटकार आणि 12 चौकारांसह 109 रन्स केले.
टेस्ट सामन्यात सामन्याच्या दोन्ही इनिंगमध्ये शतक झळकावणारा केन न्यूझीलंडचा 5वा फलंदाज ठरलाय. याशिवाय सद्याच्या टेस्टमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. स्मिथने 107 टेस्टमध्ये सामन्यांमध्ये एकूण 32 शतकं झळकावली आहेत. तर सर्वाधिक टेस्ट शतकांचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे.