Kane Williamson Record in Test : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात वेलिंग्टन येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज फलंदाज केन विल्यमसनने (Kane Williamson) शानदार शतक (Kane Williamson Century) झळकावलं. हे शतक ठोकून केनने मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. केनने रॉस टेलरला (Ross Taylor) मागे टाकलंय. (Kane Williamson overtakes Ross Taylor to become New Zealand greatest ever run scorer in NZ vs ENG 2nd Test)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केन विल्यमसनने धडाकेबाज शतक (Kane Williamson Century) झळकावलं. शतक झळकावल्यानंतर त्याने रॉस टेलर (Ross Taylor Record) आणि माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि सौरव गांगुलीसारख्या (Sourav Ganguly) दिग्गज खेळाडूंना मागे टाकलंय. केन विल्यमसनने 226 बॉलमध्ये 8 फोर खेचले. संयमी खेळीच्या मदतीने त्याने आपलं शतक पूर्ण केलं. 


गांगुली - सेहवागचा रेकॉर्ड मोडला 


केन विल्यमसनने (Kane Williamson International Career) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 39 शतकं झळकावली आहेत. त्यामुळे त्याने टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली  (Sourav Ganguly) आणि माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)  यांचा रेकॉर्ड मोडला आहे. त्याचबरोबर केनने इंग्लंडच्या अॅलेस्टर कुकला (alastair cook) देखील मागे सोडलंय.


आणखी वाचा - जसप्रीत बुमराहचं करियर धोक्यात? आता नाही तर कधीच नाही... वाचा 3 महत्त्वाची कारणं!


रॉस टेलरने केलं केनचं अभिनंदन


मी अनेक वर्षांपासून तुला खेळताना बघत आलोय. हे यश तुझ्या मेहनतीचे आणि कसोटी क्रिकेटमधील समर्पणाचा पुरावा आहे. सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडू बनल्याबद्दल तुझं अभिनंदन, असं ट्विट रॉस टेलरने केलंय.


पाहा ट्विट - 



केन विल्यमसनचं कसोटी करियर (Kane Williamson Test career)


केन विल्यमसनने आतापर्यंत 92 कसोटी सामने (Kane Williamson Test career) खेळले आहेत. त्याने 161 डावांमध्ये 53.33 च्या सरासरीने 7787 धावा केल्या आहेत. रॉस टेलरने त्याच्या करियरमध्ये 7683 धावा केल्या आहेत. विल्यमसनने आपल्या कसोटीमध्ये 26 शतकं ठोकली आहेत.