Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचं करियर धोक्यात? आता नाही तर कधीच नाही... वाचा 3 महत्त्वाची कारणं!

स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पुन्हा मैदानात परतण्याची तमाम क्रिकेट चाहते आतुरतेने वाट आहेत. मात्र, आता बुमराह यंदाच्या IPL हंगामात खेळणार नसल्याचं समोर आलंय. जसप्रीत बुमराहचं करियर (Jasprit Bumrah career) धोक्यात का? असा सवाल उपस्थित होतोय.

Updated: Feb 27, 2023, 04:27 PM IST
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचं करियर धोक्यात? आता नाही तर कधीच नाही... वाचा 3 महत्त्वाची कारणं! title=
Jasprit Bumrah Injury career

Jasprit Bumrah Injury: आयपीएलच्या (IPL 2023) नव्या हंगामापूर्वीच मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सर्वात मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यंदाच्या हंगामात खेळणार नसल्याची चर्चा सुरू आहे. कोणत्याही क्षणी MI यावर भूमिका जाहीर करू शकतं. बुमराह खेळणार नसल्याने फक्त मुंबई नाही तर टीम इंडियाचं देखील टेन्शन वाढलंय. त्यामुळे जसप्रीत बुमराहचं करियर (Jasprit Bumrah career) धोक्यात का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

रोहित शर्माचा हुकमी एक्का आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे गेला बराच कालावधी टीम इंडियापासून दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यात बुमराह खेळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण दुखापतीमुळे त्याची संघात निवड करण्यात आली नाही. मात्र, आता बुमराहचं करियर धोक्यात आल्याची शक्यता आहे. 

 

तीन महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे... 

 

1. टीम इंडियामध्ये टिकण्याची स्पर्धी

बुमराह टीममधून गेला म्हणून भारतीय संघाचं काही अडलं नाही. बुमराहच्या जागी मोहम्मद सिरीज, उमरान मलिक, अर्शदिप सिंह यांनी संघात जागा मिळवली. त्यामुळे बुमराहची कमी जास्त जाणवली नाही. बुमराह तसा टीम इंडियाचा स्टार बॉलर. मात्र, आता त्याची जागा धोक्यात आलीये ती प्रतिस्पर्धी खेळाडूंमुळे. तशाच मागील 2 वर्षात बुमराह सततच्या दुखापतीमुळे अनेकदा टीमच्या बाहेर राहिलाय.

2. खेळाडूंना विश्रांती नाही

टीम इंडियाचं शेड्यूल खूप व्यस्थ राहिलंय. टी-ट्वेंटी वर्ल्ड कप आणि नंतर सात्त्याने इतर दौरे होत राहिले. ज्यावेळी बुमराह टीम इंडियामध्ये होता. तेव्हाही टीम इंडियाचं शेड्यूल बिझी होतं. त्यामुळे वरिष्ठ खेळाडू नाराज होते. विराट रोहितने नाराजी व्यक्त केल्यानंतर बीसीसीआयने काही खेळाडूंना आराम दिला होता. मात्र, बुमराह खेळत राहिला. तर पुर्णपणे फीट नसताना देखील बुमराह सराव सामना खेळला होता.

3. आयपीएलचा अतिरेक (IPL)

आयपीएल सारख्या स्पर्धेमुळे क्रिकेटचं भांडवलीकरण होत असल्याचा आरोप केला जातो. खेळाडूंच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाची जाणीव ठेवली जात नाही, असा आरोप देखील केला जातो. बुमराह हा आयपीएलचा स्टार असल्याने प्रत्येक सामना त्याला खेळावा लागतो. त्यामुळे त्याचा परिणाम टीम इंडियाच्या परफॉर्मन्सवर होतो, अशी टीका दिग्गज खेळाडूंनी केली आहे. 

आणखी वाचा- IPL सुरु होण्यापूर्वीच Mumbai Indians साठी वाईट बातमी; मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?

चेतन शर्मा यांचा खुलासा 

एशिया कप (Asia Cup) ते वर्ल्ड कपपर्यंत (T20 World Cup) मध्ये बुमराह नव्हता. चेतन शर्मा यांनी बुमहारच्या फिटनेसवर खुलासा केला होता. चेतन शर्मा यांनी केलेल्या दाव्यानुसार बुमराहची दुखापत गंभीर होती. त्यानंतर टीम मॅनेजमेंटने त्याला वर्ल्ड कपमधून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू होता, पण तो पूर्णपणे फिट नव्हता. पण त्यानंतरही त्याला खेळवण्यात आलं, असा खुलासा चेतन शर्मा यांनी केला होता.