मुंबई: भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी हार्दिक पांड्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर हार्दिक पांड्य़ाला ऑलराऊंडर खेळाडू का म्हणावं असा प्रश्नही उपस्थित केला आहे. हार्दिक पांड्याला ऑलराऊंडर का म्हटलं जातं? तो तर एवढी गोलंदाजीही करत नाही. त्याने टी 20 वर्ल्ड कपमध्ये देखील फक्त 2 सामन्यात गोलंदाजी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिटनेसच्या कारणामुळे हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नाही. त्यामुळे त्याच्यावर अनेक प्रकारे टीका करण्यात आली होती. आता तर कपिल देव यांनी देखील प्रश्न उपस्थित केला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळाले नाही. भारताने ती मालिका 3-0 ने जिंकली. 


कपिल देव यांच्या म्हणण्यानुसार जर हार्दिक पांड्याला ऑलराऊंडर म्हणायचे असेल तर त्याला दोन्ही करावे लागेल. तो तर फक्त फलंदाजी करत आहे. तो गोलंदाजी करत नसेल तर त्याला ऑलराऊंडर का म्हणायचं? 


हार्दिक पांड्या भारतासाठी खूप महत्त्वाचा फलंदाज आहे. हार्दिक पांड्याला गोलंदाजी आणि चांगली कामगिरी करण्यासाठी बरेच सामने खेळावे लागतील. त्यानंतरच तो ऑलराऊंडर असल्याचं आपण म्हणू शकतो. क्रिकेटपटू म्हणून मिळालेल्या यशापेक्षा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडला अधिक यश मिळेल, असेही कपिल यांनी म्हटलं आहे.


राहुल द्रविड एक उत्तम क्रिकेटर आणि चांगला माणूस आहे. ते जेवढे क्रिकेटर म्हणून यशस्वी राहिले त्यापेक्षा जास्त कोच म्हणून यश मिळवतील यात शंकाच नाही. यावेळी बोलताना कपिल देव यांच्या मते त्यांनी टीम इंडियात ऑलराऊंडर कोणाला म्हणावं हेही सांगितलं आहे. 


कपिल देव यांच्या मते अश्विन हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याच सोबत जडेजा देखील ऑलराऊंडर आणि उत्तम खेळाडू आहे. त्याची गोलंदाजी जरी चांगली होत नसली तरी फलंदाजीमध्ये बऱ्य़ाच प्रमाणात प्रगती असल्याचंही यावेळी कपिल देव सांगायला विसरले नाहीत.