IND vs SL 2023: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्या खेळलेल्या जात असलेल्या टी-ट्वेंटी मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला. अखेरच्या करो किंवा मरो सामन्यात टीम इंडियाचा (Team India) स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने धुंवाधार शतक ठोकलं. त्याच्या या पारीचं जोरदार कौतूक होताना दिसतंय. अशातच आता टीम इंडियाला पहिला वर्ल्ड कप जिंकवणारे यशस्वी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी सूर्यकुमारचं तोंडभरून कौतूक केलंय. (kapil dev on suryakumar yadav explosive batting compare to sachin tendulkar virat kohli marathi news)


काय म्हणाले कपिल देव?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा कधी सूर्यकुमारच्या खेळीचे वर्णन करा असं वाटतं, तेव्हा तेव्हा माझ्याकडे शब्द कमी आहेत. जेव्हा आपण सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्माकडे (Rohit Sharma) पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की एक दिवस सूर्यकुमार त्या खेळाडूंच्या यादीत असेल, असा विचार करायलाच लागतो, असं कपिल देव म्हणतात.


भारतात खरोखरच खूप प्रतिभावान खेळाडू आहेत आणि ते ज्या प्रकारचे क्रिकेट खेळतात, ते कौतुकास्पद आहे. सूर्या लॅप फाईन लेगवर शॉट मारतो, त्यामुळे तो गोलंदाजाला घाबरवतो, कारण तो उभा राहून मिड-ऑन आणि मिड-विकेटवर षटकार मारू शकतो. हा शॉट बॉलरची लाईन आणि लेन्थ बिघडवतो. त्यामुळे नेमकं कुठं बॉल करायचाय, असा प्रश्न बॉलरला पडतो, असंही कपिल देव (Kapil Dev On Suryakumar Yadav) म्हणाले.


दरम्यान, मी व्हिव्हियन रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, डिव्हिलियर्स, रिकी पाँटिंग यांच्यासारखे महान फलंदाज पाहिलंय, पण फार कमी फलंदाज बॉलला इतक्या मोकळेपणे मारू शकतात. सूर्यकुमार यादव यांना सलाम...असे खेळाडू शतकातून एकदा येतात, असं म्हणत कपिल देव यांनी सूर्यकुमारचं तोंडभरून कौतूक केलंय.