नवी दिल्ली : मयांक अग्रवाल आणि कॅप्टन करुण नायर यांनी खेळलेल्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनल मॅचमध्ये कर्नाटकच्या टीमने महाराष्ट्रावर ९ विकेट्सने विजय मिळवला. या मॅचमध्ये महाराष्ट्राच्या टीमची बॅटिंग निराशाजनक राहीली.


बॅटिंगसाठी चांगला पीच असतानाही महाराष्ट्राच्या टीमला मोठा स्कोअर उभारता आला नाही. ४४.३ ओव्हर्समध्ये १६० रन्सवर महाराष्ट्रची टीम ऑल आऊट झाली. 


महाराष्ट्राच्या टीमने दिलेलं आव्हान गाठणं कर्नाटकला खूपकाही कठीण नव्हतं. ओपनर बॅट्समन मयांकने ८६ बॉल्समध्ये ८१ रन्स आणि कॅप्टन करुणने ९० बॉल्समध्ये ७० रन्स बनवले. अशा प्रकारे एक विकेट गमावत ३०.३ ओव्हर्समध्येच कर्नाटकने विजय मिळवला. 


या संपूर्ण सीरिजमध्ये मयांक अग्रवालने चांगली कामगिरी केली. मयांकने ६३३ रन्स बनवत राष्ट्रीय एक दिवसीय चॅम्पियनशिपच्या एका सत्रात सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू बनला आहे. शनिवारी झालेल्या मॅचमध्ये त्याने आठ फोर आणि एक सिक्सर लगावला. 


कर्नाटकच्या ओपनर जोडीला महाराष्ट्राच्या अनुपम संकलेचा, प्रदीप दाढे आणि श्रीकांत मुंढे यांना रोखण्यात अपयश आलं. त्यामुळे कर्नाटकने सहजपणे महाराष्ट्रावर विजय मिळवला.