बंगळुरु : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानतंर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने देखील या घटनेची निंदा करत चिन्नास्वामी स्टेडिअमवरुन पाकिस्तानच्या खेळाडूंचे फोटो काढून टाकले आहेत. असोसिएशनने म्हटलं की, 'सीआरपीएफ जवानांना आपलं समर्थन दर्शवण्यासाठी आणि पुलवामा हल्ल्याविरुद्ध आपला विरोध दर्शवण्यासाठी आम्ही इम्रान खानसह सगळ्या पाकिस्तानच्या खेळाडूंचे फोटो काढून टाकले आहेत.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी सगळ्यात आधी क्रिकेट क्लब इंडियाने देखील इम्रान खानचे सर्व फोटो झाकले होते. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ, पंतप्रधान इम्रान खान, शोएब मलिक, शोएब अख्तर यांचे फोटो होते. याआधी पंजाब आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनने देखील पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंचे फोटो हटवले आहेत.



क्रिकेट क्लब इंडियाने एका हॉटेलमध्ये लावण्यात आलेला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो काढून टाकला होता. सीसीआयचे मुख्यालय हे मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअममध्ये आहे.