Karun Nair Tweet: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील वनडे मालिकेतील तिसऱ्या सामना खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) ईशान किशनला (Ishan Kishan) संधी मिळाली. या संधीचं इशान किशनने सोनं केलं. त्याने आजच्या सामन्यात द्विशतक (Ishan Kishan Double Century) झळाकावत बरेच विक्रम मोडीत काढले आहेत. आजच्या सामन्यात ईशानने अनेक विक्रम नावावर केले आहेत. मात्र, अनेकदा मोठी कामगिरी करून देखील संघात स्थान मिळत नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे करूण नायर (Karun Nair)...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे ईशान किशनच्या विक्रमी द्विशतकाच्या जल्लोषात संपूर्ण सर्व मग्न असताना दुसरीकडे, एक धाडक फलंदाज ज्यानं आपली क्षमता सिद्ध केली होती, त्याला संधी देण्याची विनंती करताना दिसतोय. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात (Cricket history) फक्त असे दोन खेळाडू आहेत. ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रिपल शतक (Karun Nair Triple Century) झळकावलं आहे. त्यात नाव येतं विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि करूण नायर (Karun Nair) यांचं. 


आणखी वाचा - भर मैदानात फुल Drama! शाकिबने घेतलेल्या त्या कॅचवर विराट कोहली का संतापला? Video होतोय व्हायरल


अशातच आता करूण नायर याचं ट्विट (Karun Nair Tweet) सध्या तुफान व्हायरल होताना दिसतंय. ट्विटमध्ये करूण नायर बीसीसीआय (BCCI) आणि सिलेक्टर्सला विनंती करताना दिसतोय. Dear cricket, give me one more chance असं नायरने ट्विटमध्ये म्हटलंय. याचा अर्थ मला एक संधी द्या, असं विनंती करूण नायर करताना दिसत आहे.


पाहा Tweet -



दरम्यान, 2016 मध्ये चेन्नईच्या स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG Test Match 2016) झालेल्या सामन्यात करुणने त्रिशतक झळकावलं होतं. इंग्लंडने भारताविरुद्ध पहिल्या डावात 477 धावा केल्या होत्या. भारताने पहिला डाव 7 गड्यांच्या मोबदल्यात 759 धावा करून घोषित केला होता. त्यानंतर त्याचं नाव इतिहासाच्या पानावर नोंदवलं गेलंय. मात्र, हाच करूण नायर पुन्हा टीम इंडियामध्ये (Team India) खेळण्याच्या प्रतिक्षेत आहे.