IPL 2021: मिस्ट्री गर्ल Kaviya Maran मुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ
अखेर सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने बुधवारी आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये मॅच जिंकूण श्री गणेशा केलाच.
मुंबई : अखेर सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने बुधवारी आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये मॅच जिंकूण श्री गणेशा केलाच. त्यांनी पंजाब किंग्ज विरुद्ध 9 विकेट्सने सामना जिंकला. या विजयानंतर हैदराबादची CEO कव्या मारन खूप आनंदी दिसत होती. कव्या मारनला आनंदात पाहूण सोशल मीडियावर खळबळ उडाली. या आधी सनरायझर्स हैदराबादच्या मॅचमध्ये मिस्ट्रीगर्ल म्हणून काव्या मारण समोर आली होती आणि लोकांनी तिला खूप पसंत केले. परंतु या सीझनमध्ये हैदराबाद एकही सामना जिंकला नाही, त्यामुळे काव्या मॅच दरम्यान अत्यंत दुखी दिसायची.
शेवटाचा सामना जेव्हा हैदराबाद हारला तेव्हा काव्याचे एस्प्रेशन पाहून तिचे फॅन्स तिला पुन्हा या दुखी एस्प्रेशन मला तिला पहायचे नाही अशा प्रकारचे कमेंन्ट्स करत होते. त्यानंतर बुधवारी सनरायझर्स हैदराबाद मॅच जिंकला तेव्हा काव्याला आनंदी पाहूण तिच्या चाहत्यांना खुप आनंद झाला आहे.
कविया मारन ही सन ग्रुपचे (Sun Group) मालक कलानिथी मारन (Kalanithi Maran) यांची मुलगी आहे. तसेच ती माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांची भाची आहे. कव्या मारन ही 28 वर्षाची आहे आणि ती सन म्युझिकशी (Sun Music ) जोडली गेली आहे. आयपीएल 2018 मध्ये ती पहिल्यांदा टीव्हीवर तिच्या टीमला म्हणजेच सनरायझर्स हैदराबादला चेअर्स करताना दिसली.
MBA नंतर वडिलांच्या व्यवसायात मदत
काव्या मारन सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) चे सीईओ आहेत. एमबीए पूर्ण केल्यानंतर, काव्याने वडील कलानिथी मारन यांच्या व्यवसायाशी हातमिळवणी करण्याचे ठरविले होते. काव्याने तिच्या कंपनीत कोणतेही मोठे पद घेण्यापूर्वी अनुभव मिळवण्यासाठी सन टीव्ही नेटवर्कमध्ये इंटर्नशिप देखील केली होती. काव्या सध्या सन नेक्स्ट च्या OTT प्लॅटफोर्म Sun NXT,ची प्रमुख आहे.