लंडन :  भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांच्या डोळ्यांच्या खाणाखुणा पत्नी साक्षी नाही तर  हा क्रिकेटर अधिक चांगला समझतो आणि तसा वागतो. धोनीला नेहमीच समजदार खेळाडूंना वाव देऊन त्यांना विजेता म्हणून बदलण्याचे कसब आहे. कर्णधार असताना धोनीने रवींद्र जडेजाबाबत हे करून दाखविले आहे. 


जिंकण्यात महत्त्वाची भूमिका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या यादीत केदार जाधव याला विजेता म्हणून घडविण्याचे काम धोनी कर्णधार विराट कोहलीच्या मदतीने करत आहे. जाधवने गुरूवारी शानदार खेळी करणाऱ्या तमीम इक्बाल आणि मुशफिकर रहिम यांची जोडी फोडण्याची जी खेळी केली. त्यात धोनी आणि जाधव यांच्यातील इशारे महत्त्वाचे ठरले. जाधव याने सुरूवातील तमीमला बोल्ड केले तर मुशफिकर याला विराटकरवी झेलबाद केले. 


धोनीच्या डोळ्यात वाचण्याचा प्रयत्न 


याबद्दल केदार जाधव म्हणाला, मी टीम इंडिया हिस्सा झालो आहे. तेव्हापासून मी धोनीसोबत खूप काळ घालवत आहे. धोनीची प्रशंसा करताना केदार म्हटला, की मी धोनीशी खूप जोडला गेलो आहे. त्याला खेळामध्ये काय हवे आहे, हे त्याच्या डोळ्यात वाचण्याचा प्रयत्न करतो. त्यालाही मैदानाच हे पाहिजे असते. त्याला जसे पाहिजे तशी गोलंदाजी मी केली आहे.