ऑस्ट्रेलियाने स्वत:चीच उडवली खिल्ली
बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कडक भूमिका घेत कसोटी कर्णधार स्टीव्हन स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमेरुन बेनक्राफ्ट यांना दोषी ठरवत आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघाबाहेर काढलेय. तर कोच डॅरेन लेहमन यांना क्लीनचिट देण्यात आलीये. बॉल टेंपरिंग प्रकरणात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघावर चहूबाजूंनी टीका होतेय. ही घटना इतकी गंभीर की ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनाही यात हस्तक्षेप करावा लागला.
मुंबई : बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कडक भूमिका घेत कसोटी कर्णधार स्टीव्हन स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमेरुन बेनक्राफ्ट यांना दोषी ठरवत आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघाबाहेर काढलेय. तर कोच डॅरेन लेहमन यांना क्लीनचिट देण्यात आलीये. बॉल टेंपरिंग प्रकरणात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघावर चहूबाजूंनी टीका होतेय. ही घटना इतकी गंभीर की ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनाही यात हस्तक्षेप करावा लागला.
आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत बॉल कुरतडल्याप्रकरणी वादात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ, सलामीचा फलंदाज कॅमेरुन बेनक्राफ्टवर आयसीसीची करडी नजर आहे. आयसीसीने स्मिथवर एका सामन्याची बंदी घातलीये. तर बेनक्राफ्टच्या मॅच फीमधून दंडाची रक्कम कापण्यात आलीये.
जगभरातून टीका
बेनक्राफ्टने आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पिवळ्या टेपच्या सहाय्याने बॉलशी छेडछाड केली होती. त्यानंतर ही बाब ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने मान्य केली. तसेच ही योजना संघाची होती असल्याचेही त्याने स्पष्ट केले. हे प्रकरण समोर आल्यानंतर केवळ जगभरातूनच त्यांच्यावर टीका केली जातेय. इतकंच नव्हे तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाची खिल्लीही उडवली जातेय. बॉल टेंपरिंग प्रकरणाबाबत ऑस्ट्रेलियाच्या बेन अँड लियामने एक व्हिडीओ तयार केलाय.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ क्रिकेटर केविन पीटरसननेही फेसबुकवर पोस्ट केलाय. या व्हिडीओत खेळाडूंची खिल्ली उडवत रॅप गाणे तयार करण्यात आलेय. केविन पीटरसनने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलेय, ऑस्ट्रेलियाने स्वत:च खिल्ली उडवलीये.
हे आहे प्रकरण
द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊन येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान ही घटना घडली. आफ्रिका फलंदाजी करत होत. ३४वे षटक सुरु होती. यावेळी मार्करम आणि एबी डे विलियर्स खेळत होते. त्याचवेळी बेनक्राफ्ट एका चिपसारख्या वस्तूसकट कॅमेऱ्यात कैद झाला. सुरुवातीला ही बॉल चमकवण्यासाठी चिप असल्याचे सांगितले गेले. त्याने ती चिप बॉलवर घासली. दरम्यान, यावेळी अंपायरने बेनक्राफ्टला हटकले. तसेच अंपायरसमोर येण्यासाठी बेनक्राफ्टने पिवळ्या रंगाची वस्तू अंतवस्त्रात ठेवताना अंपायरने पाहिले होते. जेव्हा अंपायर त्याच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांनी ब्रेनकाफ्टच्या पँटचा खिसा चेक करुन पाहिला. यावेळी खिशात अनेक वस्तू होत्या.
यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि बेनक्राफ्टने याप्रकरणी आपली चूक मान्य केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्मिथने बॉल टेंपरिंगचे प्रकरणाची जबाबदारी घेतली. तसेच बेनक्राफ्टनेही बॉल टेंपरिंग केल्याचे मान्य केले.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी
ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या या वर्तनामुळे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीही नाराजी व्यक्त केलीये. ही शरमेची घटना असल्याचे पंतप्रधान मेल्कोन टर्नबुल यांनी म्हटलंय.