मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये कोलकात्याने चांगली कामगिरी केली. पहिल्यांदाच दिनेश कार्तिकने कर्णधार म्हणून कोलकात्याची जबाबदारी घेतली होती. त्याने ती खूप चांगली निभावली देखील. हैदराबादने देखील यंदाच्या सीजनमध्ये आपला कर्णधार बदलला. दोन्ही टीमने यंदा चांगली कामगिरी केली. क्वालीफायर-2 सामन्यात आधी हैदराबादने लगातार 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केला होता. तर कोलकात्याने 4 सामने जिंकले होते. फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही टीमला विजय आवश्यक होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादचे फलंदाज काही खास करु शकले नाहीत पण अफगानिस्तानच्या राशिद खानने हैदराबादसाठी विजय खेचून आणला. राशिद खानने फक्त 10 बॉलमध्ये 34 रन केले तर शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने 24 रन केले. हैदराबादने 174 रनचं लक्ष कोलकात्यापुढे ठेवलं होतं. कोलकात्याकडून नरेन आणि क्रिस लिनने सुरुवातीला चांगली कामगिरी केली. पण हैदराबादच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यावर शाहरुख खानने देखील ट्विट करुन प्रतिक्रिया दिली.



किंग खानने म्हटलं की, 'कोलकात्याचा प्रवास येथेच थांबला. हैदराबादकडून मिळालेल्या पराभवामुळे कोलकाता फायनलमधून बाहेर पडली. मला फ्लाईटचं तिकीट रद्द करावं लागलं. पण माझा टीमने शानदार प्रदर्शन केलं. त्यासाठी धन्यवाद... आपण एक चांगली टीम आहोत आणि आपण शानदार खेळ केला.'