मुंबई : मुंबई विरुद्ध लखनऊ झालेल्या सामन्यात एक अनोखं चित्र पहायला मिळालं. सामन्यात पुन्हा एकदा कृणाल पांड्या आणि किरन पोलॉर्ड चर्चेत आला. कृणालने पोलार्डची विकेट घेतल्यानंतर त्याच्या जवळ जात उडी मारून त्याच्या डोक्याला kiss केलं. याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान कृणालच्या या कृत्यावर टीकाही झाली आणि दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी यावर प्रश्नही उपस्थित केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर याबाबत आता किरण पोलार्डने मौन सोडलं आहे. यासंदर्भात त्याने ट्विट केलंय. पोलार्ड म्हणाला, विकेट घेण्याच्या कलेक्शनमध्ये तुझं स्वागत आहे. तुला माहितीये मी गोलंदाजीवरून किती गंभीर असतो. अखेरीस हे 1-1 झालं. जे घडलं ते खूप छान होतं.



मुंबईकडून खेळताना पोलार्ड 19 धावा करून आऊट झाला. त्यानंतर तो तंबुत जात असताना कृणाल पांड्याने त्याला मागून मिठी मारली आणि KISS केलं. कृणाल पांड्याने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला.


कृणाल पांड्या आणि पोलार्ड खूप चांगले मित्र आहेत. मुंबई टीममधून ते दोघं खेळत असताना त्यांच्या मैत्रीची चर्चा होत असे. आता दोघंही वेगळ्या टीममधून खेळत असताना त्यांच्यातील मैत्री तुटली नाही तर अजूनही टिकून आहे. त्याचं हा व्हिडीओ उत्तम उदाहरण आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


लखनऊ टीमने मुंबईचा 36 धावांनी पराभव केला. मुंबई टीमचा सलग 8 वा पराभव आहे. मुंबई टीम या पराभवानंतर प्ले ऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. पांड्यासमोर पोलार्ड फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने मित्र म्हणून जीवदान दिलं नाही तर पोलार्डची विकेट घेतली.