फायनल सामन्यापूर्वी किवी कर्णधार टेन्शनमध्ये?; केन विल्यमसन म्हणतो...
आज टी-20 वर्ल्डकपचा थरार संपणार आहे.
दुबई : आज टी-20 वर्ल्डकपचा थरार संपणार आहे. न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यामधील एक टीम वर्ल्डकपवर हक्क गाजवणार आहे. दरम्यान न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने शनिवारी T-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 'बिग फायनल'ची चर्चा फेटाळून लावलीये. केन म्हणाला की, हा आमच्यासाठी आणखी एका सामन्यासारखा आहे ज्यामध्ये त्याचं लक्ष त्याच्या चांगल्या लयीवर आहे आणि त्याला कायम ठेवावं लागेल.
फायनल सामन्यापूर्वी काय म्हणाला केन?
न्यूझीलंड क्रिकेट संघ 2015 आणि 2019 एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता आणि पहिली जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकली. सामन्याच्या पूर्वसंध्येला केन विल्यमसन म्हणाला, 'यासाठी खूप मेहनत लागणार आहे. पण आज आमच्यासाठी आणखी एक सामना आहे आणि आम्ही पुन्हा छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू.'
टीमच्या कामगिरीवर खूश केन
केन विल्यमसन म्हणाला, "आमची टीम एकत्रितपणे चांगली कामगिरी करतेय आणि आम्ही निश्चितपणे एकमेकांना पूर्ण पाठिंबा देतोय. आम्ही नियमितपणे शिकण्याचा प्रयत्न करणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आज आमच्याकडे आणखी एक संधी मिळणार आहे."
केन पुढे म्हणाला, "अंडरडॉग म्हणून उतरणार का ही गोष्ट आमच्यासाठी जास्त महत्त्वाची नाहीये. आम्ही आमच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करतो आणि एक संघ म्हणून सुधारणा करत राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. वैयक्तिक टॅग किंवा त्यासंबंधी कशावरही आमचं नियंत्रण नाही.