मुंबई : आयपीएलच्या ११व्या सीझनमध्ये कोलकाताने बुधवारी इडन गार्डनवर रंगलेल्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सला २५ धावांनी मात देत क्वालिफायर २मध्ये जागा मिळवली. क्वालिफायर२चा मुकाबला शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यााधीच कोलकाताला खुशखबर मिळालीये. कोलकाताचा वेगवान फलंदाज कमलेश नागरकोटी संघात परतणार आहे. नागरकोटीच्या पायाला दुखापत झाल्याने आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. कमलेशने लिस्ट ए सामन्यातील ८ सामन्यांमध्ये ९ विकेट मिळवले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत सात विकेट गमावताना १६९ धावा केल्या. राजस्थानला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. २० षटकांत चार विकेट गमावताना १४४ धावा केल्या. हैदराबाला कोलकाताविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी लागेल. एकीकडे धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ फायनलमध्ये पोहोचलाय. त्यामुळे हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात आज फायनलसाठी सामना रंगणार आहे. 


संभाव्य संघ 


कोलकाता - दिनेश कार्तिक(कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरेन, क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, मिशेल जॉन्सन, पियुष चावला. कुलदीप यादव, शुभमन गिल, इशांक जग्गी, नितीश राणा, विनय कुमार, अपूर्व वानखेडे, रिंकू सिंह, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, कॅमेरुन डेलपोर्ट, जेवॉन सियर्ल्स, टॉम कुरेन आणि प्रसिद्ध कृष्णा


हैदराबाद - केन विल्यमसन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, शिखर धवन, शाकिब अल हसन, मनीष पांडे, कार्लोस ब्राथवेट, युसुफ पठाण, वृद्धिमन साहा, रशीद खान, रिक्की भुई, दीपक हुड्डा, सिद्धार्थ कौल, टी नटराजन, मोहम्मद नाबी, बासिल थम्पी, के. खलील अहमद, संदीप शर्मा, सचिन बेबी, क्रिस जॉर्डन, तन्मय अग्रवाल, श्रीवत्स गोस्वामी, विपुल शर्मा, मेहेदी हसन आणि अॅलेक्स हेल्स.