मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. लखनऊने या सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी केली होती. मात्र मॅचमध्ये झालेल्या एका चुकीमुळे सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु झाली. यावरून अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही टीमचे कर्णधारांचा चेहरा ग्राफिक्सच्या मदतीने दाखवण्यात आला. यावेळी आयपीएलच्या ब्रॉडकास्टरकडून एक मोठी चूक झाली. यावेळी ग्राफिक्समध्ये के.एल राहुलसोबत लखनऊऐवजी सनरायझर्स हैदराबादचा लोगो लावण्यात आला होता. यामुळे लोकांनी के.एल राहुल हैदराबादचा कर्णधार झाला का असा सवाल केलाय. 


तर दुसऱ्या बाजूला ऋषभ पंतचा फोटो लावण्यात आला होता. आणि त्याच्यासोबत दिल्लीऐवजी लखनऊ सुपर जाएंट्सचा लोगो लावण्यात आला होता. हे ग्राफिक पाहून लोकांनी याची प्रचंड मजा घेतली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरलंही होतोय.



या प्रकारानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. एका युझरने म्हटलंय की, राहुल कधीपासून हैदराबादसाठी खेळू लागला. दरम्यान लखनऊचा कर्णधार के. एल राहुल सर्वात महागडा प्लेअर असून लखनऊ त्याच्यासाठी 17 कोटी रूपये मोजले.