दुबई : विराट कोहलीची टीम आरसीबी (RCB) आणि केएल राहुलची पंजाब किंग्ज (Punjab kings) यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला, पण या सामन्यात वादही झाला. बंगळुरूच्या डावादरम्यान काहीतरी घडले, त्यानंतर पंजाबचा कर्णधार केएल राहुल अंपायरवर भडकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

8 व्या षटकात आरसीबीच्या फलंदाजीदरम्यान सलामीवीर देवदत्त पडिक्कलने रवी बिश्नोईच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या हातमोज्याला लागला आणि यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातात आला.


व्हिडिओ रिप्ले पाहताना, बॉल देवदत्त पडिक्कलच्या ग्लोव्हला स्पर्श करताना दिसला. केएल राहुलने जोरदार आवाहन केले, पण त्याचा फील्ड अंपायरवर कोणताही परिणाम झाला नाही आणि पडिक्कलला नाबाद घोषित करण्यात आले.



त्यानंतर केएल राहुलने रिव्यू घेतला. तिसऱ्या अंपायरने ही देवदत्त पडिक्कलला नाबाद दिले. यावर पंजाब किंग्जचा कर्णधार भडकला आणि मैदानावर उपस्थित अंपायरकडे जावून काही बोलला. क्रिकेट चाहतेही या निर्णयावर नाराज दिसले.