IND vs PAK : लय झालं पाकिस्तानचं नाटक! आता सुट्टी नाय... टीम इंडियाने आशिया कपसाठी बोलवला `खास` खेळाडू
Indoor nets session at the NCC : केएल राहुल, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव या सहा खेळाडूंनी आज नेटमध्ये तीन तास प्रॅक्टिस केल्याचं पहायला मिळतंय.
IND vs PAK, Asia Cup : आशिया कपमध्ये आता पुन्हा भारत आणि पाकिस्तान (Pakistan Vs India) आमने सामने येणार आहे. 2 सप्टेंबर रोजी झालेल्या सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यानंतर आता येत्या 10 सप्टेंबर रोजी भारतीय संघ पुन्हा एकदा पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा दैना उडवली. टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma), शुभमन गिल, तसेच विराट कोहली (Virat Kohli) देखील फेल ठरले. त्यामुळे टीम इंडियाचा टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळल्याचं पहायला मिळालंय. अशातच आता पाकिस्तानचे धाबे दणाणण्याची शक्यता आहे. त्याला कारण म्हणजे टीम इंडियामध्ये स्कॉडमध्ये नव्या खेळाडूची एन्ट्री झालीये.
टीम इंडियामध्ये खास खेळाडूची एन्ट्री
पहिल्या सामन्यात झालेली परिस्थिती पाहून टीम इंडिया पूर्ण तयारी करत आहे. गेली दोन दिवस संघ नेटमध्ये घाम गाळताना दिसतोय. भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या कोलंबो शहरात आहे. त्यावेळी केएल राहुल सरावाला उपस्थित होता. त्यामुळे राहुल (KL Rahul) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनू शकतो. त्यामुळे आता पाकिस्तानला घाम फुटला आहे. खुद्द मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी राहुलला मोलाचे सल्ले दिलेत. त्यामुळे आता राहुल पाकिस्तानची बँड वाजवणार हे नक्की...
केएल राहुल, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव या सहा खेळाडूंनी आज नेटमध्ये तीन तास प्रॅक्टिस केल्याचं पहायला मिळतंय. आशिया कपबरोबरच आता वर्ल्ड कपमध्ये देखील केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सुपर 4 च्या पहिल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं भले बांगलादेशवर विजय मिळवला असेल. मात्र, भारतासोबत होणाऱ्या सामन्याचा रिझल्ट पाकिस्तानी प्रेक्षकांना आतापासूनच माहीत झालाय.
दरम्यान, गेल्या 2 सप्टेंबरला झालेली भारत-पाकिस्तान मॅच पावसात वाहून गेली. मात्र, असा चमत्कार दरदिवशी घडत नाही, याची जाणीव पाकिस्तानलाही आहे. भारतीय टीम आणि भारतीय खेळाडूंचा सध्याच्या फॉर्म पाहता पाकिस्तानला धडकी भरणं स्वाभाविक आहे. त्यात बाबर सेनेच्या खेळाडूंमधील सावळागोंधळ पाकिस्तान्यांची चिंता आणखी वाढवतोय. बाबर आझमच्या कॅप्टनशीपवर प्रेक्षक चांगलेच भडकलेत. हे सगळं पाहिलं तर 10 सप्टेंबरचा मुकाबला पाकिस्तानी बाबर सेना हरणार, हे अगदीच स्पष्ट आहे.