मुंबई : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिजला वनडे मालिकेत क्लिन स्विप दिला आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्याच टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 96 रन्सनी पराभव केला. मात्र या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एक अपयशी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता विराटची टीममधील जागा धोक्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली जेव्हापासून कर्णधार म्हणून खेळत नाहीये तेव्हापासून त्याची फलंदाजी काही चांगली होताना दिसत नाहीये. एकेकाळी टीम इंडियाचा रन मशिन असलेला विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जातोय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याचा खराब फॉर्म वेस्ट इंडिज मालिकेतही त्याची पाठ सोडत नाही.


वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो 8 रन्सवर बाद झाला होता. त्याचवेळी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला केवळ 18 रन्स करता आले. तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो खातंही उघडू शकला नाही आणि गोलंदाज अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर कॅच आऊट झाला.


गेल्या दोन वर्षांपासून विराटला एकंही शतक झळकवता आलेलं नाही. दरम्यान आता अशा परिस्थितीत टीम इंडियामध्ये त्याची जागा धोक्यात येऊ शकते. उपकर्णधार केएल राहुल विराट कोहलीची जागा घेऊ शकतो. राहुल हा अतिशय क्लासिक फलंदाज असून तो अतिशय शांतपणे फलंदाजी करतो. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी शतक झळकावलंय. 


टीम इंडियातील केएल राहुलची फलंदाजी अजून निश्चित झालेली नाही. कधी तो ओपनिंगला तर कधी मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजीसाठी उतरतो. अशा परिस्थितीत टीम मॅनेजमेंट विराट कोहलीच्या ऐवजी तिसऱ्या नंबरवर केएल राहुलचा विचार करू शकते.