मुंबई : टीम इंडियासाठी मोठा धक्का म्हणजे के एल राहुल सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला. त्याला दुखापत झाल्याने टीम इंडियातून त्याला बाहेर जावं लागलं. के एल राहुल इंग्लंड दौऱ्यातूनही बाहेर गेला आहे. त्याला ग्रोइन इंज्युरी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

के एल राहुलने नुकताच एक फोटो शेअर केला. त्यावरून तो उपचार घेण्यासाठी जर्मनीत गेल्याची माहिती मिळाली आहे. ग्रोइन इंज्युरीवर उपचार घेण्यासाठी त्याने जर्मनी गाठलं आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी क्रिकेटप्रेमी प्रार्थना करत आहेत. 


30 वर्षांचा के एल राहुल ग्रोइन इंज्युरीमुळे त्रस्त आहे. त्याचे उपचार घेण्यासाठी जर्मनीमध्ये पोहोचला आहे. त्याने जर्मनीमध्ये पोहोचताच चाहत्यांसोबत फोटो शेअर केला. तुमच्या शुभेच्छा, प्रार्थना राहुदे असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 


चाहत्यांनी के एल राहुलला लवकर बरं होऊन ये असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे असंही म्हटलं आहे. तर दुसरा युजर म्हणतो अथिया तुला फोन करेल. 


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर एक राहिलेला कसोटी सामना, तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची सीरिज खेळायची आहे. आता कसोटी टीम जाहीर झाली असून ती इंग्लंडमध्ये सध्या सराव करत आहे. दुखापतीमुळे राहुल सातही सामन्यांमधून बाहेर पडला आहे.