मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या घरी लवकरच सनईचौघडे वाजणार आहे. एवढेच काय तर डबल सेलिब्रेशन देखील होणार आहे. असं बोललं जात आहे की, सुनीलची मुलगी अथिया शेट्टी आणि तिचा मुलगा अहान शेट्टी दोघेही लवकरच आपल्या पार्टनरसोबत सात फेरे घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अथिया तिचा बॉयफ्रेंड क्रिकेटर केएल राहुलसोबत, तर अहान त्याची गर्लफ्रेंड तान्या श्रॉफसोबत आयुष्याचा प्रवास पुढे नेणार आहे.


एका रिपोर्टनुसार, सुनील शेट्टीच्या घरी यंदा डबल सेलिब्रेशन असणार आहे. अभिनेत्याच्या एका जवळच्या मित्राने पोर्टलशी संवाद साधत याबाबत माहिती दिली आहे.


सूत्राने सांगितले की, 'अथिया-राहुलचे लग्न 2022 मध्ये निश्चित झाले आहे.' त्याचवेळी अहानला त्याची गर्लफ्रेंड तान्यासोबत लवकरच लग्न करायचे आहे, जे या वर्षी होऊ शकते. या बातमीत कितपत तथ्य आहे, हे येत्या काही दिवसांत कळेलच. तूर्तास, या वृत्ताशी संबंधित व्यक्तीच्या वक्तव्याची प्रतीक्षा केली जाईल.


अथिया आणि केएल राहुलच्या नात्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या वर्षी अथियाच्या वाढदिवशी केएल राहुलने त्यांचे नाते इन्स्टाग्रामवर अधिकृत केले होते.


त्यानंतर अथियानेही सोशल मीडियावर तिच्या नात्याबद्दल खुलासा केला. या दोघांच्या प्रेमाची चर्चा अनेक दिवसांपासून बॉलीवूडमध्ये रंगत असली तरी, दोघांच्याही प्रेमाची फक्त प्रतीक्षा होती. दुसरीकडे, अहान शेट्टी बराच काळ तान्या श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.


अहानने 2021 मध्ये 'तडप' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा एक रोमँटिक अॅक्शन ड्रामा आहे, ज्यामध्ये तारा सुतारिया अहानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली होती.


या चित्रपटातील अहानच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये अहान, तान्या, अथिया, केएल राहुल हे चौघेही सुनील आणि त्याची पत्नी माणा शेट्टीसोबत दिसले.