मुंबई : ऑस्ट्रेलियाचा स्पिनर शेन वॉर्नचं गेल्या शुक्रवारी निधन झालं. संपूर्ण जग या दिग्गजाच्या अकाली जाण्याने सर्वांच्या मनाला चटका बसला आहे. त्याचे चाहते, मित्र तसं अनेक क्रिकटर्स वॉर्नसोबतच्या आठवणी शेअर करत आहेत. वॉर्नच्या चाहत्यांना त्याच्यासंदर्भातील अनेक गोष्टींची माहिती असेल, मात्र त्याच्या गाड्यांच्या आवडीबाबत फार कमी जणांना कल्पना असेल.


शेन वॉर्नला तुफान धावणाऱ्या गाड्यांची 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेन वॉर्नला गाड्यांची प्रचंड आवड होती. वॉर्नला फेरारी तसंच लॅम्बोर्गिनी या गाड्या खूप आवडत होत्या. याबाबत त्याने एकदा सांगितलं होतं की, त्याच्याकडे 20 गाड्याचं गॅरेज आहे. 


वॉर्नकडे होत्या 'या' महागड्या गाड्या


कोट्यावधी रुपयांची Bentley Continental Supersports वॉर्नची सर्वात आवडती गाडी होती जी त्याने खरेदीही केली होती. त्यासोबत वॉर्नकजे Bugatti Veyron ही आलिशान कारही होती. त्याचप्रमाणे त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये 2 मर्सिडीज, 2 BMW आणि Holden VK Commodore यांचाही समावेश होता.


किती संपत्ती शेन वॉर्नच्या नावावर? 


जगातील श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये शेन वॉर्नचं नाव घेतलं जातं. Celebritynetworth.com नुसार वॉर्नची एकूण संपत्ती सुमारे 50 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 385 कोटी रुपये एवढी होती.