India vs Pakistan, T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्ड कप 2022 ला (T 20 World Cup 2022) सुरुवात होऊन आता काही दिवस उलटलेत. वर्ल्ड कपच्या पहिल्या काही दिवसांमध्ये मोठे उलटफेर पहायला मिळाले. विंडिजसारख्या 2 वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या दिग्गज संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली. दरम्यान आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे 23 ऑक्टोबरला होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्याकडे लागून राहिलंय. मात्र या सामन्याआधी क्रिकेट चाहते गूगलवर या सामन्यासंदर्भात गूगल करुन माहिती घेत आहेत. (know cricket fans what seach on google before t 20 world cup 2022 ind vs pak highvoltage match)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये रंगणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. सामन्याच्या दिवशी पाऊस होण्याची शक्यता ही 80 ते 90 टक्के आहे.


फॅन्स नक्की काय सर्च करतायेत? 


मेलबर्नमध्ये होणाऱ्या या सामन्याआधी चाहते अनेक गोष्टी गूगलवर सर्च करतायेत. चाहते नक्की काय सर्च करतायेत याची माहिती आयपीएल फ्रँचायजी कोलकाता नाईट रायडर्सने सोशल मीडियावर दिली आहे. केकेआरकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड आहेत.  


सोबतच नेटकऱ्यांनी गूगलवर काय सर्च केलंय, याची सर्च हिस्ट्रीही जोडलीय. मेलबर्नमध्ये होणाऱ्या सामन्याच्या दिवशी वातावरण कसं असेल, याबाबत अनेकांना जाणून घ्यायचंय. 


वर्ल्ड कपपेक्षा क्रिकेट चाहत्यांचं भारत-पाक सामन्यावर लक्ष आहे. या सामन्याचे सर्व तिकीट आधीच बूक झाले आहेत. या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आलेला नाही. त्यात सामन्यावर पावसाचं सावट आहे. यामुळे पावसाने सामन्यात विघ्न घातल्यास चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो. यामुळे चाहते सामन्याच्या दिवशी मेलबर्नमधील वातावरण कसं असेल याबाबत जाणून घेत आहेत.