लीड्स : भारत आणि इंग्लंडमधल्या तिसऱ्या वनडेमध्ये कर्णधार विराट कोहलीनं नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. कर्णधार असताना सर्वात जलद तीन हजार रन करणारा विराट हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी कर्णधार म्हणून विराटनं सर्वात जलद एक हजार आणि दोन हजार रन केल्या होत्या. विराट कोहलीनं ४९ इनिंगमध्ये ३ हजार रनचा टप्पा ओलांडला. १७ इनिंगमध्ये विराटनं एक हजार रन आणि ३६ इनिंगमध्ये दोन हजार रन केल्या. तीन हजार रन पूर्ण करण्यासाठी विराटला १२ रनची आवश्यकता होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीच्या आधी हे रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होतं. डिव्हिलियर्सनं ६० इनिंगमध्ये तीन हजार रन केल्या होत्या. विराटनं हे रेकॉर्ड फक्त ४९ इनिंगमध्येच केलं.


सर्वात जलद तीन हजार रन करणारे कर्णधार


खेळाडू               मैच       इनिंग 


विराट कोहली       ५२         ४९
एबी डिविलियर्स     ६३         ६०
एमएस धोनी          ८०         ७०
सौरव गांगुली         ७५        ७४
ग्रॅम स्मिथ              ८५        ८३