भारताच्या कोनेरू हम्पीने जिंकला वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपचा खिताब
World Rapid Chess Championship : भारताची नंबर वन महिला खेळाडू चीनच्या जू वेनजुननंतर हे विजेतेपद एकापेक्षा जास्त वेळा जिंकणारी हम्पी ही दुसरी खेळाडू आहे.
World Rapid Chess Championship : काही दिवसांपूर्वीच भारताचा बुद्धिबळपटू डी मुकेश वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचे (World Rapid Chess Championship) विजेतेपद जिंकून इतिहास रचला होता. आता क्रीडा विश्वातून भारतासाठी अजून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिने वॉल स्ट्रीटमध्ये रविवारी FIDE वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावून भारताच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा रोवला आहे. तिने 11 व्या राउंडमध्ये इरीन सुकंदर हिला हरवून वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपचा खिताब जिंकला. 2019 मध्ये मॉस्को येथे झालेली स्पर्धा देखील हम्पीने जिंकली होती. हा तिने जिंकलेला दुसरा वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपचा खिताब आहे. भारताची नंबर वन महिला खेळाडू चीनच्या जू वेनजुननंतर हे विजेतेपद एकापेक्षा जास्त वेळा जिंकणारी हम्पी ही दुसरी खेळाडू आहे.
37 वर्षीय हम्पीने 11 मधून 8.5 अंक मिळवत टूर्नामेंटची सांगता केली. रूसमधील 18 वर्षीय वोलोडर मुर्जिन पुरुष वर्गातील विजेतेपद पटकावले. मुर्जिन हा नोदिरबेक अब्दुसाटोरोव्हनंतर दुसरा सर्वात तरुण FIDE वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन आहे. नोदिरबेकने वयाच्या 17 व्या वर्षी विजेतेपद पटकावले. हम्पीने मिळवलेल्या यशानंतर भारतीय बुद्धिबळासाठी हे अत्यंत खास वर्ष ठरलं.
हम्पी ही नेहमीच वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये तिच्या खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन करते. तिने मॉस्को येथे 2012 रोजी वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य तर 2023 मध्ये उज्बेकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकेल होते. कोनेरू हम्पी हिचे वडील अशोक हम्पी हे देखील बुद्धिबळपटू होते. कोनेरूला तिच्या वडिलांनीच बुद्धिबळाची ट्रेनिंग दिलेली आहे.
हेही वाचा : ऑस्ट्रेलिया अब की बार भी 300 पार, 9 व्या विकेटसाठी भारतीय गोलंदाजांचा घाम काढला
कोनेरूचे वडील अशोक हे प्राध्यापक होते. वयाच्या 5 व्या वर्षापासून त्यांनी आपल्या मुलीला बुद्धिबळ खेळायला शिकवले. मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील अशोकनी आपल्या नोकरीचा त्याग केला आणि कोनेरूला त्यांनी ट्रेनिंग दिले. हम्पीने वयाच्या 7 व्या वर्षी बुद्धिबळातील पहिली स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने अंडर 12, अंडर 14 आणि अंडर 16 या स्पर्धांमध्ये देखील नेशनल चॅम्पियनशिपमचे विजेतेपद पटकावले होते.