आयपीएलच्या मेगा-फायनलमध्ये क्रिती सेनॉन करणार परफॉर्म
आयपीएलच्या मेगा-फायनलचा मुकाबला थोड्याच वेळात सुरु होणार आहे.
मुंबई : आयपीएलच्या मेगा-फायनलचा मुकाबला थोड्याच वेळात सुरु होणार आहे. या मॅचमध्ये धोनीच्या चेन्नईचा सामना केन विलियमसनच्या हैदराबादशी होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही लढाई होणार आहे. पण या मेगा-फायनलच्या आधी बॉलीवूड सेलिब्रिटीही आयपीएलच्या क्लोजिंग सेरिमनीमध्ये परफॉर्म करणार आहेत. अभिनेत्री क्रिती सेनॉनही डान्स करणार आहे. मागच्या वर्षीच्या आयपीएलच्या ओपनिंग सेरिमनीमध्येही क्रितीनं परफॉर्म केलं होतं. यावर्षीच्या परफॉर्मन्सच्या सरावाचा एक व्हिडिओ क्रितीनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. राबता चित्रपटाच्या गाण्यावर क्रिती परफॉर्म करणार आहे. याचबरोबर क्रिती तिचे आधीचे चित्रपट बरेली की बर्फी, हिरोपंती आणि दिलवाले या चित्रपटाच्या गाण्यांवरही डान्स करेल.
क्रिती सेनॉनच्या डान्सबरोबरच रेस-३ ची टीम त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशनही करणार आहे. सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस रेस-३चं गाणं 'हीरिए'वर डान्स करणार आहेत. यावेळी सलमान आयपीएलमधली त्याची आवडती टीम आणि आवडत्या खेळाडूबद्दल खुलासा करणार आहे. याचबरोबर या सोहळ्यात डेजी शाह आणि यूलिया वंतूरही येणार आहेत. रणबीर कपूर आणि कतरिना कैफही या सोहळ्याला उपस्थित राहतिल असं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणबीर एक स्पेशल सेगमेंट होस्ट करणार असून कतरिना कैफ डान्स करणार आहे.
क्रितीला बॉलीवूडमध्ये पदार्पण करून फक्त ४ वर्षच झाली आहेत. पण इन्स्टाग्रामवर तिचे ११ मिलियन फॉलोअर्स आहेत. वरूण धवन आणि शाहरुख खानबरोबर क्रितीनं काम केलं आहे. बरेली की बर्फी या चित्रपटातल्या तिच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं.