GT vs LSG: आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) विरूद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरातच्या टीमने टॉस जिंकून (Gujarat Titans Win toss) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी हा निर्णय गुजरातसाठी फारसा फायदेशीर ठरला नाही. गुजरातच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये अवघे 135 रन्स केले. यावेळी गुजरात टायटन्सचा ओपनर शुभमन गिल (Shubman Gill) आजच्या सामन्यात फेल गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या आयपीएलमध्ये शुभमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं दिसतंय. या सिझनमध्ये त्याने दोन अर्धशतकं झळकावली आहेत. पंजाब आणि चेन्नईविरूद्धच्या सामन्यात त्याने ही खेळी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यातंही तो चांगला खेळेल अशी अपेक्षा होती. मात्र लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्धच्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आलेला नाही.


शुभमन गिलचा व्हिडीओ व्हायरल


लखनऊ विरूद्धच्या सामन्यात दुसऱ्याच ओव्हरमध्ये शुभमन शून्याच्या स्कोरवर पव्हेलियनमध्ये परतला. कृणाल पंड्याच्या (Krunal Pandya) दुसऱ्या बॉलवर रवी बिश्नोईच्या हाती कॅच देत त्याने विकेट गमावली. यावेळी आऊट झाल्यानंतर गिलने अपशब्द वापरल्याचं कॅमेरात कैद झालंय. तर दुसरीकडे तो पव्हेलियनमध्ये परतत असताना गिलला एक खास फ्लाईंग किस मिळाली आहे.


कृणालने दिली गिलला फ्लाईंग किस


कृणालने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर शुभमनला माघारी धाडलं. यावेळी गिल कॅच आऊट झाल्यानंतर परत पव्हेलियनमध्ये जात असताना कृणालने शुभमनला खास फ्लाईंग किस दिली. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. दरम्यान चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. 



कृणाल पंड्याची उत्तम गोलंदाजी


लखनऊ विरूद्धच्या सामन्यात कृणालने उत्तम गोलंदाजी केली. यावेळी 4 विकेट्स फेकत त्याने 2 विकेट्स देखील काढल्या. यावेळी त्याने केवळ 4 च्या इकोनॉमीने त्याने रन्स खर्च केले आहेत. 


दोन्ही टीम्सची प्लेईंग 11 


लखनऊ सुपर जाएंट्स: केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टोइनिस, क्रुणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), अमित मिश्रा, आवेश खान, रवि बिश्नोई, आयुष बदोनी, नवीन उल हक


सब्सटीट्यूटः कृष्णप्पा गौतम, डेनियल सम्स, प्रेरक मांकड, कर्ण शर्मा, जयदेव उनादकट


गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेविड मिलर, नूर अहमद, मोहित शर्मा, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी


सब्सटीट्यूटः जोश लिटिल, शिवम मावी, साई किशोर, श्रीकर भरत, जयंत यादव