कोलंबो : श्रीलंकेविरुद्धची दुसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि ५३ रन्सनी जिंकली. पण या टेस्टनंतर लगेचच भारताला धक्का बसला. मैदानामध्ये गैरवर्तणूक केल्यामुळे रवींद्र जडेजाचं एका मॅचसाठी निलंबन करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तिसऱ्या टेस्टमध्ये रवींद्र जडेजाच्याऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवड करण्यात आलेल्या संघामध्ये अश्विन, जडेजा आणि कुलदीप यादव हे तिघं स्पिनर्स आहेत. आता जडेजाच्या निलंबनामुळे कुलदीप यादवच्या खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १२ ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन टेस्ट मॅच जिंकून भारतानं या सीरिजमध्ये विजयी आघाडी घेतली आहे.